

सुरत/हैदराबाद ; वृत्तसंस्था : ज्ञानवापी, ताजमहाल, श्रीकृष्ण जन्मभूमी आणि कुतुबमिनारवरून पेटलेल्या वादात 'भडकाऊ भाईजान' म्हणून ओळखले जाणारे 'एमआयएम'चे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एका वादग्रस्त फेसबुक पोस्टने पेट्रोल ओतण्याचे काम केले आहे. 'मोगलांच्या बायका कोण होत्या? ते आधी सांगावे; मग आपण बाकीचे बोलू,' असे आव्हानवजा वक्तव्य ओवैसी यांनी या वादातील हिंदू पक्षाला उद्देशून केले आहे.
भाजपसह करणी सेना या क्षत्रियांच्या संघटनेने ओवैसींचा याबद्दल तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ओवैसींच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना करणी सेनेचे अध्यक्ष सूरजपाल अम्मू यांनी म्हटले आहे की, ओवैसी हिंदूंच्या भावना दुखावत आहेतच; पण त्यासह त्यांच्या या वक्तव्याने, मोगलांनी केवळ मंदिरेच नव्हे; तर भारतातील माता-भगिनींची आबरू लुटण्याचे कामही केलेले आहे, हेही स्पष्ट केलेले आहे.
तत्पूर्वी, सुरतच्या सभेत औरंगजेबाची वकिली करताना ओवैसी म्हणाले की, सम्राट अशोकानेही मंदिरे पाडली, पुष्यमित्राने विहार पाडले, त्याबद्दल कुणीच काही बोलत नाही. औरंगजेबावर आणि मुस्लिम शासकांवरच तोंडसुख घेतात…
…मग औरंगजेबाच्या कबरीवर गुडघे टेकायला का गेलात?
ओवैसी यांनी पोस्टमध्ये पुढे म्हटलेले आहे की, भारतीय मुसलमानांचे मोगलांशी कुठलेही नाते नाही. मोगलांच्या बायका कोण होत्या ते आधी सांगा… यावर मोगलांशी नाते नाही, तर मग खुलताबादेत औरंगजेबाच्या कबरीवर गुडघे टेकायला यांचा (ओवैसींचा) भाऊ (अकबरुद्दीन) का म्हणून गेला होता, असा सवालही अम्मू यांनी उपस्थित केला आहे.
ओवैसींची ही काही वक्तव्ये
गळ्यावर सुरी ठेवली तरी भारतमाता की जय म्हणणार नाही.
सुप्रीम कोर्टाचा निर्णय असला म्हणून काय झाले, मी मानत नाही.
2 मुलांनाच जन्म द्यावा असा कायदा बनवून दाखवाच; आम्ही पाहू