Crime News : अरेरे! २० रुपयांची कचोरी पडली २० लाखांना...! चोरट्यांनी क्षणात लांबवली रोकड असणारी बॅग!

जयपूरमधील धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद
Jaipur robbery viral video
प्रातिनिधिक छायाचित्र.File Photo
Published on: 
Updated on: 

Jaipur robbery viral video : जयपूरमध्ये एका व्यावसायिकासाठी २० रुपयांची कचोरी अत्यंत महागडी ठरली. दुचाकीवरून २० लाखांची रोकड घेऊन जाताना त्यांना कचोरी खाण्याचा मोह झाला. यासाठी ते थांबले. कचोरी खात असतानाच दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्याकडील २० लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग पळवून नेली. नाहरगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये व्यावसायिक चंपलाल आरामात आपल्या स्कूटरवर बसून कचोरी खाताना दिसत आहेत. ते कचोरी खाण्यात मग्न असतानाच, दुसऱ्या स्कूटरवरून दोन व्यक्ती त्यांच्या जवळ येतात. मागच्या सीटवर बसलेली व्यक्ती चटकन रोख रकमेची बॅग हिसकावून घेते आणि दोघेही तिथून पळून जातात.

Jaipur robbery viral video
Goa Crime News| गोव्यात ड्रग्स तस्करीचे मोठे जाळे उद्ध्वस्त; मांद्रे पोलिसांकडून चार कुख्यात तस्करांना बेड्या

धावत पाठलाग; पण २० लाखांची रोकड घेऊन चोरटे पसार

चंपलाल कचोरी खात होते. त्यांच्या हातात अजूनही कचोरी होती, तेवढ्यात चोरट्यांनी डाव साधला. स्कूटरच्या समोर ठेवलेली रोकड असणारी बॅग हिसकावून घेत दोघे चोरटे दुचाकीवरून पसार झाले. चंपलाल यांनी संशयितांचा धावत पाठलाग केला. स्थानिक लोकही मदतीसाठी पुढे आले, परंतु ते दोन चोर पळून जाण्यात यशस्वी झाले.

Jaipur robbery viral video
Pune Crime News: पुण्यात भररस्त्यात तरुणीला उचलण्याचा प्रयत्न; नराधमाने नको त्या ठिकाणी स्पर्श केला, मैत्रीण मदतीला धावली अन्...

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू

नाहरगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. हेल्मेट घातलेल्या चोरट्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Jaipur robbery viral video
Pimpri Crime News: इन्स्टाग्रामवरील व्हिडीओ डिलीट केल्याने विद्यार्थिनीवर चाकूहल्ला; म्हाळुंगेतील घटना

२० रुपयांची कचोरी पडली २० लाखांना...!

चंपलाल यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून, तब्बल २० लाखांची रोकड जवळ असताना २० रुपयांची कचोरी खाण्याचा मोह किती महागात पडला, याची चर्चा व्हायरल व्हिडिओमुळे सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news