Goa Crime News| गोव्यात ड्रग्स तस्करीचे मोठे जाळे उद्ध्वस्त; मांद्रे पोलिसांकडून चार कुख्यात तस्करांना बेड्या

Goa Crime News| मोर्जी येथील कोकेन प्रकरणाचा तपास करताना मांद्रे पोलिसांनी अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराचे जाळे उघडकीस आणत आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे.
Drug Case
Drug Case Pudhari
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मोर्जी येथील कोकेन प्रकरणाचा तपास करताना मांद्रे पोलिसांनी अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराचे जाळे उघडकीस आणत आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. या प्रकरणात २२२.९२ ग्रॅम संशयित कोकेन, १० लाख ८५ हजार ३०० रुपयांची रोकड आणि इतर साहित्य मिळून एकूण ३३ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Drug Case
URPro Card Goa Digital | यूआरप्रो कार्डसाठी केवळ 5 टक्के जमीनमालकांकडून कागदपत्रे सादर; पणजी, मडगावमधील सर्वेक्षणाचे वृत्त

मोर्जी, बांदेकरवाडा येथील ग्रीनव्ह्यू गेस्ट हाऊसमध्ये २२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.२० ते ११.३० या वेळेस परदेशी नागरिकांच्या बेकायदेशीर वास्तव्याबाबत एफआरआरओ पथकासोबत तपासणी सुरू होती. त्यावेळी खोली क्रमांक एफ-०३ मध्ये सेनेगलचे नागरिक बौबा सांबा (वय ३१) आणि अलिकु मुस्तफा (वय ३१) यांच्याकडे कोकेन असल्याचा संशय असलेली पांढऱ्या रंगाची भुक्ती आढळली.

तिचे वजन २२२.९२ ग्रॅम असून अंदाजे किंमत २२ लाख २९ हजार २०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले. याशिवाय रोकड आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले.
या प्रकरणी मांद्रे पोलिस स्थानकात २३ ऑगस्ट रोजी अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा १९८५ च्या कलम २१(सी) सह २९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.

Drug Case
Nagali Hills Taleigao | नागाळी हिल्स-ताळगाव येथे शाब्दिक वादातून झालेल्या हल्ल्याप्रकरणी चार संशयितांना पणजी पोलिसांकडून अटक

उत्तर प्रदेशातील संशयिताचा माग

बँक व्यवहारांच्या तपासात एभ्हिणीने जमा केलेली रक्कम दिल्ली-एनसीआर परिसरात काढली जात असल्याचे आढळले. त्यानंतर दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश येथे पोलिसांचे पथक पाठवण्यात आले. या तपासदरम्यान नायजेरियन नागरिक विल्यम उगोचुक्कु इज्युचुक्कु याची माहिती समोर आली.

तो उत्तर प्रदेशातील सूरजपूर, यूपीएसआयडीसी परिसरात राहत होता. अमली पदार्थांच्या अवैध खरेदीसाठी तो संबंधित रक्कम स्वीकारत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्याला उत्तर प्रदेशतून ताब्यात घेऊन २३ ऑक्टोबर रोजी मांद्रे पोलिस स्थानकात आणून पुढील तपासासाठी अटक करण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गिरीश नाईक आणि पोलिस उपनिरीक्षक परेश काळे करीत आहेत. पेडणे उपविभागीय पोलिस अधिकारी आशीष शिरोडकर, उत्तर गोवाचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या देखरेखीखाली आणि पोलिस उपमहानिरीक्षक वेद प्रकाश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news