

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा देशात सोमवारी दिवसभरात २ हजार ३३८ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, १९ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, २ हजार १३४ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. मंगळवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७४%, तर दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.६४% नोंदवण्यात आला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे ४ कोटी ३१ लाख ५८ हजार ८७ पर्यंत पोहचली आहे. यातील ४ कोटी २६ लाख १५ हजार ५७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, १७ हजार ८८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुदैवाने आतापर्यंत ५ लाख २४ हजार ६३० रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
देशात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९३ कोटी ४५ लाख १९ हजार ८०५ डोस लावण्यात आले आहेत. यातील ३.३९ कोटी डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना लावण्यात आले आहेत. तर, खबरदारी म्हणून आतापर्यंत ३ कोटी ५१ लाख बूस्टर डोस लावण्यात आले आहेत.
केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ डोस पैकी १५ कोटी ४२ लाख ६० हजार ९३० डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ८५ कोटी ४ लाख ४१ हजार २९२ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ३ लाख ६३ हजार ८८३ तपासण्या सोमवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.
हे ही वाचलंत का?