ड्रायव्हर चहा घ्यायला उतरताच २ कोटींची ATM कॅश व्हॅन पळवली

ड्रायव्हर चहा घ्यायला उतरताच २ कोटींची ATM कॅश व्हॅन पळवली

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमधील गांधीधाम येथील बँकिंग सर्कलमधून फिल्मी स्टाईलने करोडो रुपये लुटण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला. हिताची केस मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची २ कोटी २३ लाख रुपयांची रोकड भरलेली कॅश व्हॅन लुटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. एटीएमबाहेर चहा घेण्यासाठी कॅश व्हॅन उभी केल्यानंतर ड्रायव्हर आणि गार्ड खाली उतरताच चोरट्यांनी पैशांनी भरलेली कॅश व्हॅन घेऊन पळ काढला.

याप्रकरणी हिताची कॅश मॅनेजमेंट कंपनीच्या दोघांसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. राहुल रामजी संजोत, विवेक उर्फ ​​विवान रामजी संजोत, हितेश वेलजी फफळ, राहुल हिरजी बारोट, नितीन गोपाल गजरा (भानुशाली) आणि गौतम प्रकाश विंजोडा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

कच्छची औद्योगिक राजधानी असलेले गांधीधाम शहर आर्थिक आघाडीवर नेहमीच पुढे असते. बंदराशी जोडलेल्या या नगर संकुलात दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते, मात्र मात्र शुक्रवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी सकाळी बँकेच्या एटीएमबाहेर चहा घेण्यासाठी कॅश व्हॅन उभी केल्यानंतर चालक आणि गार्ड खाली उतरताच चोरट्यांनी कॅश व्हॅन घेऊन पोबारा केला. चालक आणि गार्डच्या हे लक्षात येताच त्यांनी तेथील एक बाईक घेतली आणि व्हॅनचा पाठलाग सुरू केला. पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच पोलिसांनी पाठलाग सुरू केला. पकडले जाण्याच्या भीतीने चोरट्यांनी कॅश व्हॅन रस्त्यामध्येच सोडून पळ काढला. पोलिसांनी एटीएम कॅश व्हॅन ताब्यात घेतली असून सर्व पैसे सुरक्षित आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news