

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसमध्ये सुधारणा करण्यासाठी स्वत: पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला आहे. आज झालेल्या बैठकीत त्यांनी महत्त्वाची घोषणा केली. काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत सुधारणा आणि 'भारत जोडो यात्रा' यासाठी राजकीय घडामोडी गट, टास्क फोर्स- 2024 आणि केंद्रीय नियोजन गट स्थापन केल्याचे सोनिया गांधी यांनी जाहीर केले. राजस्थानमधील उदयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या काँग्रेसच्या नवसंकल्प चिंतन शिबिरात ही पावले उचलण्यात आली आहेत. तर टास्क फोर्स-2024 मध्ये आठ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे, अशी सोनिया गांधी यांनी माहिती दिली. (Prashant Kishor Congress Cconnection)
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसने दंड थोपटले आहेत हेच यावरून स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या टास्क फोर्स 2024 मध्ये अप्रत्यक्षरित्या रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एन्ट्री केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याचे कारण म्हणजे प्रशांत किशोर यांच्या एका माजी सहका-याचा थेट टास्क फोर्स 2024 सहभाग करण्यात आला आहे. निवडणूक व्यवस्थापनासाठी काँग्रेस पक्षाने प्रशांत किशोर यांचे माजी सहकारी सुनील कांगोलू यांची निवड केली आहे. सध्या कांगोलू तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये काँग्रेससोबत काम करत आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती आखत आहेत. (Prashant Kishor Congress Cconnection)
अलीकडेच प्रशांत किशोर यांनी 2024 च्या निवडणुकीच्या रोडमॅपसाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोर एक प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी 2024 च्या निवडणुकांसाठी एक योजना असल्याचे विधान केले. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये येण्यास नकार दिला. परिवर्तनवादी सुधारणांद्वारे खोलवर रुजलेल्या संरचनात्मक समस्यांचे निराकरण करण्यासाठी पक्षाला "नेतृत्व आणि सामूहिक इच्छाशक्ती" आवश्यक असल्याचे किशोर म्हणाले होते. (Prashant Kishor Congress Cconnection)
टास्क फोर्स-2024 मध्ये आठ नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम, मुकुल वासनिक, जयराम रमेश, केसी वेणुगोपाल, अजय माकन, प्रियंका गांधी रणदीप सिंग सुरजेवाला आणि निवडणूक रणनीतीकार सुनील कांगोलू यांचा समावेश आहे. त्याचबरोबर दिग्विजय सिंह, सचिन पायलट, शशी थरूर यांच्यासह नऊ नेत्यांचा केंद्रीय नियोजन गटामध्ये असतील. (Prashant Kishor Congress Cconnection)