पंजाबमध्ये आप सरकारची मोठी कारवाई; भ्रष्टाचार प्रकरणी आरोग्यमंत्र्याला मंत्रिपदावरुन हटवले, एसीबीकडून अटक

पंजाबमध्ये आप सरकारची मोठी कारवाई; भ्रष्टाचार प्रकरणी आरोग्यमंत्र्याला मंत्रिपदावरुन हटवले, एसीबीकडून अटक
Published on
Updated on

चंदीगड; पुढारी ऑनलाईन

पंजाबमधील भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आम आदमीच्या पक्षाने भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई केली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्याचे आरोग्यमंत्री विजय सिंगला यांच्याविरुद्ध आलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींची गंभीर देखल घेत त्यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी केली आहे. कंत्राटासाठी ते अधिकाऱ्यांकडून १ टक्के कमिशनची मागणी करत होते. सिंगला यांच्याविरुद्ध ठोस पुरावे सापडल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, विजय सिंगला यांना मंत्रिपदावरुन हटवल्यानंतर भ्रष्टाचार प्रकरणी त्यांना पंजाबच्या लाचलुचपत विभागाने (Punjab's Anti-Corruption Branch) अटक केली.

"देशाच्या इतिहासात दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांनी थेट त्यांच्या मंत्र्यावर कठोर कारवाई केली," असा दावा पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयाने एका निवेदनातून केला आहे. याआधी, २०१५ मध्ये, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या एका मंत्र्याला भ्रष्टाचाराच्या प्रकरणी बडतर्फ केले होते, पंजाबच्या सीएमओने (CMO) पुढे म्हटले आहे.

मुख्यमंत्री मान यांनी मंगळवारी सांगितले की, आरोग्यमंत्री विजय सिंगला यांना राज्य मंत्रिमंडळातून हटविण्यात आले आहे. निविदांसाठी ते कमिशनची मागणी करत होते. पोलिसांना त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्याचेही निर्देशही देण्यात आले आहेत. मी काही मंत्र्यांविरोधात कडक कारवाई करत आहे. त्यांनी मी मंत्रिमंडळातून हटवत आहे. सिंगला यांनी चुकीचे काम केल्याची कबुली दिल्याचा दावा मुख्यमंत्री मान यांनी एका व्हिडिओ संदेशातून केला आहे.

पंजाबमध्ये आपचा मोठा विजय झाल्यानंतर भगवंत मान मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. आप आणि भगवंत मान यांनी राज्यातील भ्रष्टाचार संपविण्याचे आश्वासन दिले होते. आता आप सरकारमधील एका मंत्र्याला भ्रष्टाचार प्रकरणी मंत्रिमंडळातून हटविण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news