भाजप नेते कृपाशंकर सिंग यांना एक्स दर्जाची सुरक्षा | पुढारी

भाजप नेते कृपाशंकर सिंग यांना एक्स दर्जाची सुरक्षा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काही वर्षांपूर्वी काँग्रेसला रामराम करून भाजपवासी झालेले ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंग यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे. येत्या सप्टेंबरनंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी सिंग यांना ही सुरक्षा मिळाली आहे. गुप्तचर संस्थांकडून प्राप्त झालेल्या अहवालानंतर त्यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय झाला आहे.

एक्स दर्जाची सुरक्षा प्राप्त झाल्यानंतर सिंग यांच्या सुरक्षेत तीन जवान तैनात होतील. कृपाशंकर सिंग हे मुंबईतील उत्तर भारतीयांचे प्रमुख नेते आहेत. सध्या ते भाजपच्या उत्तर भारतीय विभागाचे अध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वीच आयबीने सिंग यांची सुरक्षितता धोक्यात असल्याचे सांगितले होते. सिंग यांनी 2019 साली काँग्रेसला रामराम केला होता. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी जम्मू काश्मीरसाठीचे कलम संपुष्टात आणण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले होते.

हेही वाचलतं का?

Back to top button