असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “मी अल्लाहला घाबरतो; मोदी किंवा योगीला नाही”

असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “मी अल्लाहला घाबरतो; मोदी किंवा योगीला नाही”

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्ञानवापी मशिदीच्या आवारामध्ये शिवलिंग सापडल्याच्या हिंदू पक्षाच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवैसींनी आपलं मत व्यक्त केले. "ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर बोलल्यावर लोक मला प्रश्न विचारतात. पण मी बोलणार कारण मी माझा 'जमीर' विकला नाहीय आणि विकणारही नाहीय. मी बोलतो कारण मी केवळ अल्लाहला घाबरतो कोणत्या मोदी किंवा योगीला नाही. मी यासाठी बोलतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाने मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय", असे मत एमआयएमचे प्रमुख नेते आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मांडले.

गुजरातमधील वडगाममध्ये एका सभेमध्ये ओवैसी बोलत होते. ते म्हणाले की, "आता पुन्हा कोणतीही मशीद आम्ही गमावणार नाही आणि ज्ञानवापी ही कयामतपर्यंत मशिदच राहणार. जेव्हा मी २०-२१ वर्षांचा होतो तेव्हा बाबरी मशीद माझ्याकडून हिसकावून घेण्यात आली. आता आम्ही १९-२० वर्षांच्या मुलांच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा मशीद गमावणार नाही. इंशा अल्लाह. यांना संदेश पोहोचला पाहिजे की मशीद आता आम्ही गमावणार नाही. आम्हाला तुमच्या क्लृप्त्या आता ठाऊक झाल्यात", असेही ओवैसी म्हणाले.

"ज्ञानवापी मशीद ही मशीद होती आणि जोपर्यंत अल्लाह जगात कायम आहे तोपर्यंत ही मशीद राहणार. जर आपण आपल्या गावातील आणि शहरांमधील मशिदींना सुरक्षित ठेवलं तर यांना संदेश जाईल की भारताचा मुस्लीम आता मशीद गमावण्याच्या तयारीत नाहीय",असे आवाहन ओवैसी यांनी मुस्लीम बांधवांना केलेले आहे.

पहा व्हिडीओ : नमाची भाकरी फुगली की फसली? पाहा "कोण ठरणार अस्सल सुगरणबाई' !

हे वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news