Bangladesh Crisis| शेख हसीना भारतात सुरक्षित स्‍थळी

परराष्‍ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे संसदेत निवेदन
Bangladesh Crisis
बांगला देशमध्ये १९ हजार भारतीय; एस. जयशंकर यांचे संसदेत निवेदनFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगला देशच्‍या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी अल्प सूचनेवर भारतात येण्याची परवानगी देण्याची विनंती केली. त्‍या सोमवारी (दि.५ जुलै) सायंकाळी दिल्लीत दाखल झाल्‍या असून, त्या सुरक्षित आहेत. बांगला देशात सध्या १९ हजार भारतीय असून, त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती आज ( दि.६) परराष्ट्रमंत्री एस.जयंकर यांनी संसदेत दिली.

बांगला देश स्थितीत बाबत राज्यसभा सभागृहात निवेदन केले. तत्पूर्वी आज (दि.६ जुलै) सकाळी परराष्ट्र मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी आज दुपारी राज्यसभेत बांग्लादेशातील परिस्थितीबद्दल महत्त्वपूर्ण निवेदन केले. यावेळी त्यांनी अंदाजे १९ हजार भारतीय नागरिक बांगला देशात अडकले असून, यामध्ये सुमारे ९ हजार विद्यार्थी असल्याचे संसदेत बोलताना स्पष्ट केले आहे.

देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्याचे निर्देश; एस. जयशंकर

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर म्हणाले, आम्ही आमच्या राजनैतिक अभ्यासाद्वारे भारतीय समुदायाच्या सतत संपर्कात आहोत. सध्या बांगलादेशात १९ हजार भारतीय असून, येथील कायदा आणि सुव्यवस्थेवर आम्ही गंभीरपणे चिंतित असून परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. देशाची सीमा सुरक्षा किंवा सुरक्षित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आम्ही ढाकामधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत, असेही जयशंकर यांनी निवेदन करताना म्हटले आहे.

शेख हसीना काही क्षणासाठी भारतात

सोमवार ५ ऑगस्ट रोजी ढाका येथे आरक्षण मुद्द्यावर निदर्शक एकत्र आले. त्यानंतर बांगला देशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांशी भेट घेत, पंतप्रधान हसीना यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या हेलिकॉप्टने ढाका येथून रवाना झाल्या. दरम्यान अगदी अल्प सूचनेवर शेख हसीना यांनी या क्षणी भारतात येण्याची परवानगी देण्याची विनंती भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला केली. सोमवारी (दि.५ जुलै) संध्याकाळी दिल्लीत आल्या असून, त्या सुरक्षित असल्याचे जयशंकर यांनी राज्यसभेत स्पष्ट केले.

२०२४ च्या निवडणुकांपासून बांगला देशच्या राजकारणात तणाव

भारत-बांगलादेश संबंध अनेक दशकांपासून अत्यंत घनिष्ठ आहेत. अलीकडील हिंसाचाराबद्दल एस जयशंकर यांनी राजकीय चिंता व्यक्त केली . जानेवारी 2024 मधील निवडणुकीपासून, बांगलादेशच्या राजकारणात लक्षणीय तणाव, खोल फूट आणि ध्रुवीकरण वाढत असल्याचेही भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राज्यसभेत बोलताना सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news