मनीष सिसोदिया : ‘बुलडोझर कारवाई म्हणजे भाजपचे वसुली अभियान’! | पुढारी

मनीष सिसोदिया : 'बुलडोझर कारवाई म्हणजे भाजपचे वसुली अभियान'!

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: केवळ पैशांसाठी भाजपकडून राजधानी दिल्लीत देशातील सर्वात मोठी ‘बुलडोझर’ कारवाई केली जात आहे, असा सनसनाटी आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतून केला.

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात

यासंबंधी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून दिल्लीतील महानगर पालिकांकडून सुरू करण्यात आलेली ‘बुलडोझर’ अर्थात अतिक्रमण विरोधी कारवाई थांबवण्याची मागणी केली आहे. भाजप शासित महानगर पालिकांकडून ४ मे पासून करण्यात येत असलेली कारवाईमागे मोठे षडयंत्र आहे. यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करण्याची विनंती देखील सिसोदियांकडून करण्यात आली आहे.

पुणे : अवैध बांधकामांवरील कारवाईचा वेग वाढणार

भाजपशासित महानगर पालिकांनी दिल्लीतील ६३ लाख घरांना तोडण्याची योजना आखली असून देशभरातील ही सर्वात मोठी ‘तबाही’ ठरेल आणि सर्वत्र हाहाकार माजेल असेही त्यांनी यावेळी नमुद केले. कारवाईतून दिल्लीतील ७०% लोकसंख्येवर बुलडोझर चालवला जाईल, असा दावा सिसोदियांनी केला. ६३ लाख घरांपैकी ६० लाख घरे ही झोपडपट्ट्या तसेच अनाधिकृत कॉलनींमध्ये आहेत. तर, तीन लाख घरे अधिकृत कॉलनींमधील आहेत, असा दावा सिसोदियांनी केला.

‘हरित हायड्रोजन’ अर्थव्यवस्थेसाठी २५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

पैसे द्या अन्यथा बुलडोझरने उद्ध्वस्त होण्यास तयार रहा,असा थेट संदेश भाजप या ६३ लाख कुटुंबांना देत असल्याचा दावा देखील सिसोदियांनी केला. भाजपनेच अगोदर पैसे घेवून या लोकांना वसवले. आता ते त्यांना बुलडोझरची भीती दाखवून वसुली करीत आहेत. आम आदमी पार्टी याचा विरोध करीत आहे. एमसीडीत भाजपचा कार्यकाळ पुर्ण झाला आहे. पंरतु, केवळ वसुलीसाठी भाजपकडून बुलडोझर कारवाई केली जात आहे. वेळप्रसंगी तुरूंगात जावे लागले तरी जावू. पंरतु, बुलडोझर कारवाई थांबवूच असे सिसोदिया यावेळी म्हणाले.

हे वाचलंत का?

Back to top button