Sensex : आरबीआयने रेपो रेट वाढवताच सेंसेक्स 1400 अंकांनी कोसळला

Sensex : आरबीआयने रेपो रेट वाढवताच सेंसेक्स 1400 अंकांनी कोसळला
Published on
Updated on

मुंबई : पुढारी ऑनलाईन

आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर त्याचा परिणाम शेअर बाजारांवर दिसून आला. रिझव्‍‌र्ह बँकेने अचानक रेपो दरात वाढ केल्याची घोषणा केल्याने बाजारात खळबळ उडाली. दुपारी 2.45 पर्यंत सेन्सेक्स-निफ्टीमध्ये प्रचंड घसरण सुरू होती. सेन्सेक्स 1400, तर निफ्टी 400 अंकांनी घसरला. दुपारी 2.55 वाजता सेन्सेक्स 1,413.65 अंकांनी किंवा 2.48 टक्क्यांनी घसरून 55,562.34 च्या पातळीवर आला. त्याच वेळी, निफ्टी या कालावधीत 395.65 अंकांनी किंवा 2.32 टक्क्यांनी 16,673.45 च्या पातळीवर आला.

RBI च्या चलनविषयक धोरण समितीने (RBI MPC) बुधवारी रेपो दरात 40 बेस पॉइंट्स किंवा 0.4 टक्क्यांनी वाढ केली. म्हणजेच आता रेपो रेट 4.4 टक्के झाला आहे. सतत वाढत चाललेली किरकोळ महागाई लक्षात घेऊन ही दरवाढ करण्यात आल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले.

आज बाजारात सुरुवातीच्या व्यवहारातही घसरण दिसून आली. सुरवातीला बेंचमार्क निर्देशांक किंचित वाढीसह खुले झाले, परंतु त्यानंतर फ्लॅट व्यवहार दिसून आला. सुरवातीला, सेन्सेक्स 63.69 अंकांनी किंवा 0.11% वाढून 57,039.68 वर पोहचला. त्याच वेळी, निफ्टी 23.90 अंकांची किंवा 0.14 टक्क्यांची वाढ नोंदवून 17,093 अंकांपर्यत पोहचले. सकाळी 09.53 वाजता सेन्सेक्स-निफ्टी रेड मार्कवर आला होता. यादरम्यान सेन्सेक्स 56,937.54 च्या पातळीवर होता. त्याने 38.45 अंक किंवा 0.067 टक्क्यांची घसरण नोंदवली होती. त्याच वेळी, निफ्टी 17,056.40 च्या पातळीवर यत निर्देशांक 12.70 अंक किंवा 0.074 टक्क्यांची घसरण नोंदवली होती.

सुरुवातीच्या व्यवहारात ब्रिटानिया, ओएनजीसी, टाटा मोटर्स आणि बजाज ऑटो निफ्टीमध्ये सर्वात जास्त वाढले, तर हिंदाल्को, अपोलो हॉस्पिटल्स, भारती एअरटेल यांच्यात मोठी घसरण नोंदवली गेली. तर सेन्सेक्समध्ये डॉ. रेड्डीज, टायटन, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस आणि एचडीएफसी बँक यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तर पॉवर ग्रीड, एनटीपीसी, इन्फोसिस आणि विप्रो पॉझिटीव्हमध्ये गेले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news