राजस्थान : जोधपूरमध्ये हिंसाचारामुळे परिस्थिती गंभीर; प्रशासनाकडून इंटरनेट बंद | पुढारी

राजस्थान : जोधपूरमध्ये हिंसाचारामुळे परिस्थिती गंभीर; प्रशासनाकडून इंटरनेट बंद

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानमधील जोधपूर येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठीृ तात्पुरती इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यासंदर्भात मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयातून आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा दंडाधिकारी यांच्या निवेदनानुसार जोधपूर जिल्ह्यात मंगळवारी १ वाजता इंटरनेट बंद करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले होते. एप्रिल महिन्यात झालेल्या सांप्रदायिक हिंसेमुळे हा आदेश देण्यात आला आहे.

जोधपुरच्या जालोरी गेटजवळ सोमवारी रात्री मोठा गोंधळ निर्माण झाला होता. स्वातंत्र्यसेनानी बाल मुकुंद बिस्सा यांच्या मुर्तीवर झेंडा फडकविण्यात आला होता आणि ईदनिमित्त रस्त्यावर लावण्यात आलेल्या बॅनरमुळे तणाव निर्माण झाला होता. समोर आलेल्या माहितीनुसार दोन समुदायांमध्ये जोरादार संघर्ष वाद झालेला होता. परिस्थिती इतकी चिघळली की, पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

इतकंच नाही तर अश्रुधूरांचाही वापर करण्यात आला. या हिंसाचारात अनेक गाड्यांचे नुकसान झाले. सध्या संवेदनशील परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सरकारी आदेशानुसार 2G/3G/4G/डेटा (मोबाइल इंटरनेट), बल्क एसएमएस/एमएमएस/व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर और अन्य सोशल मीडियाच्या सेवा तात्पुरत्या बंद करण्याात आल्या आहेत. आदेशात पुढे असे सांगण्यात आले आहे की, जोधपूरमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि शांतता टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झालेले आहे.

करौलीमध्ये हिंदू नववर्षानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान हिंसा घडलेली होती. त्यानंतर कर्फ्यू लावण्यात आला होता आणि कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. प्रशासनाकडून इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि ६०० पोलीस कर्मचाऱ्यांनी तैनात करण्यात आली होती. हिंसाचारात सुमारे २४ लोक जखमी झालेले होते.

पहा व्हिडिओ : राज ठाकरेंची औरंगाबादमधील सभा थोडक्यात

Back to top button