शिक्षिकेसोबत हेड मास्तरांची स्टोअर रुममध्ये रासलीला ! गावकऱ्यांनी ‘तो’ व्हिडिओच केला व्हायरल | पुढारी

शिक्षिकेसोबत हेड मास्तरांची स्टोअर रुममध्ये रासलीला ! गावकऱ्यांनी 'तो' व्हिडिओच केला व्हायरल

रायपूर; पुढारी ऑनलाईन : छत्तीसगडमधील कांकेर येथील एका सरकारी हायस्कूलच्या मुख्याध्यापकाला शाळेत लैंगिक संबंध ठेवताना रंगेहाथ पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पकडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने मुख्याध्यापकाला निलंबित केलं आहे.

जिल्हा प्रशासनाने मुख्याध्यापकांना निलंबित केल्याने छत्तीसगडमध्ये चर्चा रंगली आहे. एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ज्यामध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षिका शाळेच्या स्टोअररूममध्ये संभोग करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली, जिथे मुख्याध्यापक इंटरनेटवर व्हिडिओ पोस्ट न करण्यासाठी लाच देताना दिसून येत आहे. मात्र, ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी चंदनकुमार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर प्रशासनाने चौकशी करून मुख्याध्यापकांना निलंबित केले.

जिल्हा शिक्षणाधिकारी टी.आर.साहू यांनी सांगितले की, तक्रार प्राप्त झाली असून चौकशी करण्यात आली आहे. चौकशीतील निष्कर्षांच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुख्याध्यापकांना निलंबित केले.

हे ही वाचलं का ?

Back to top button