नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचे पुत्र वरुण आणि नवी दिल्लीतील प्रदीप दुधाणे यांची कन्या नम्रता यांच्या विवाहानिमित्त त्यांचा स्वागत समारंभ एपीजे अब्दुल कलाम रोड येथे पार पडला. भारतीय जनता पक्षासह इतर पक्षांचे अनेक दिग्गज नेते नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी समारंभास उपस्थित होते.
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल, योगगुरू बाबा रामदेव, दै. 'पुढारी'चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव आणि सौ. स्मितादेवी जाधव, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, भाजप नेत्या शायना एनसी, भाजप नेते सुनील देवधर यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.