chaiwali girl : पदवी घेऊनही नोकरी नाही, तरुणीने कॉलेजसमोरच सुरु केला चहाचा गाडा

chaiwali girl : पदवी घेऊनही नोकरी नाही, तरुणीने कॉलेजसमोरच सुरु केला चहाचा गाडा

पाटणा (बिहार); पुढारी ऑनलाईन :देशात कितीही शिक्षण घेतले तरी चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीत. यामुळे दिवसेंदिवस तरूणामध्ये बेरोजगारीची समस्या वाढत चालली आहे. काही तरूणांनी तर बेरोजगारीमुळे आत्महत्या केल्या आहेत, तर काहीजण निराशेत गेल्याचे दिसून येत आहे. परंतु, काही ठिकाणी अत्यंत धाडसाने या समस्येवर मात करत नवी उमेद घेवून येत आहेत. अशीच एक घटना बिहारमधील पाटणा येथे राहणाऱ्या प्रियांका गुप्ता हिची आहे. प्रियांकाने पदवीधर असून ही स्वत: चा एक चहाचा ( chaiwali girl ) स्टॉल सुरू केला आहे. या व्यवसायाची सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरू आहे.

सुत्राच्या माहितीनुसार, बिहारमधील पाटणा येथे राहणाऱ्या प्रियांका गुप्ताने अर्थशास्त्रात २०१९ मध्ये पदवी घेतली आहे. शिक्षण घेवून तिला चांगल्या प्रकारची नोकरी मिळू शकली नाही. यामुळे ती निराशेत गेली. परंतु, काही काळातच स्वत: ला सावरत तिने पुढे काहीतरू नविन करून दाखण्याची जिद्द केली आणि तिने पाटणा येथील महिला महाविद्यालयासमोर एक चहाचा स्टॉल ( chaiwali girl ) सुरू केला. यानंतर अनेक जण तिच्या चहाच्या दुकानावर चहा घेण्यासाठी येवू लागले. या स्टॉलच्या बॅनरवर तिने 'अगर लोग क्या सोचेंगे ये भी हम सोचेंगे तो लोग क्या सोचेंगे।' असे लिहिले आहे.

याचदरम्यान नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले की, माझे शिक्षण २०१९ मध्ये पूर्ण झाले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत मला नोकरी मिळाली नाही. प्रफुल्ल बिलोर यांच्याकडून प्रेरणा मिळाली असून जेव्हा देशात अनेक चायवाले असू शकतात तर चायवाली का असू शकत नाही?' असे तिने प्रश्न उपस्थित केला आहे. तर या तिच्या धाडसाने तरूण वर्गाला प्रेरणा देखील मिळत आहे.

या बाबतची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी प्रियांकाच्या कामांचे कौतुक केले आहे. यात एका यूजर्सने लिहिले आहे की, 'कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. अशा विचारांचा काय उपयोग की, जो आपल्या स्वप्नांना रोखू शकेल.' तर दुसऱ्या एका युजर्सने तिचे भरभरून कौतुक करत तिच्याकडून नव्या तरूण पिढीला प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले आहे. याच दरम्यान काही नेटकऱ्यांची नजर बॅनरवरील चॉकलेट चहा आणि पान चहावर पडल्याने हा कोणता प्रकारचा चहा आहे? अशा प्रश्न पडला आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news