राजू शेट्टी म्हणाले, शेतीला दिवसा विजेसाठी न्यायालयात जाणार

राजू शेट्टी
राजू शेट्टी
Published on
Updated on

सेालापूर ; पुढारी वृत्तसेवा : सुरक्षितपणे काम करणार्‍या कारखानदार, उद्योजकांना दिवसा वीज दिली जाते. मात्र, असुरक्षित असूनही शेतकर्‍यांना रात्रीचा वीजपुरवठा असा अजब कारभार आहे. यातून राज्यशासन मानवी हक्काचे उल्लंघन करीत आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार बैठकीत केला. शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी व शेतीला दिवसा वीज मिळण्यासाठी आपण न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, रात्री-अपरात्री शेतात पाणी देताना हिंस्त्र प्राणी आणि सर्प दंशाने अनेक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीवर सर्वांचा समान हक्क असताना शेतकर्‍यांच्या बाबतीत मात्र दुजाभाव केला जात असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती दिनापासून राज्यात शेतकर्‍यांच्या हक्कासाठी बळीराजा हुंकार यात्रा राज्यभरात शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काढण्यात आली आहे.त्याचाच भाग म्हणून सोलापूर दौर्‍यावर आल्याचे शेट्टी म्हणाले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीसह भाजपावर ही जोरदार टीका केली.

ते म्हणाले, घटक पक्षाचा निवडणुकीत केवळ वापर करून घ्यायचा आणि पुन्हा वार्‍यावर सोडून द्यायचा उद्योगच सत्ताधारी, विरोधी पक्षांनी केला. शेतकर्‍यांच्या हक्कासाठी दोघांचेही अनुभव घेतले. पण आपल्याला सत्ता महत्वाची नाही. त्यामुळे आपण शेतकरी चळवळीसोबत कायम राहिलो आहे.

हमिभावासाठी राष्ट्रपतींसाठी भेटणार

राजू शेट्टी म्हणाले, हमीभाव नाही, त्यात कोरोना, लहरी हवामानाचा फटका वारंवार शेतकर्‍यांना सहन करावा लागतो. आता सर्व असून वीजबिल थकबाकीसाठी कनेक्शन तोडण्याचा उद्योग केला जातो. त्यातच शेतकर्‍यांना रात्री-अपरात्री वीजपुरवठा करण्याचा वर्षानुवर्षे चुकीचा पायंडा पाडला आहे.

वास्तविक कारखाना, उद्योगांना सुरक्षित ठिकाणी वीज द्यावी लागते. त्यामुळे तेथे दिवसा भारनियमन झाले तर काय फरक पडतो. उलट शेतकर्‍यांना रात्री अंधारात हिंस्त्र प्राणी, साप-विंचवाचा धोका पत्करून पाणी पाजण्याची वेळ येते. हे एकप्रकारे मानवी हक्काचे उल्लंघन आहे. त्यामुळे येणार्‍या 1 मे रोजीच्या ग्रामसभांमध्ये राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये शेतकर्‍यांना दिवसा वीज द्यावी तसेच त्यांच्या मानवी हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी कायदा करावा अशी मागणी करण्यात येणार आहे.

शेट्टी म्हणाले, सध्या ऊस सोडला तर इतर पीकांना हमी भाव मिळत नाही. एकूण 23 विविध पीकांना हमी भाव असला तरी केवळ ऊसालाच त्याचा लाभ होत आहे.त्यामुळे आता या 23 पिकांसह फळे, पाले-भाज्या आणि दुधाला ही हमी भाव मिळावा तसेच त्यासाठी केंद्र शासनाने कायदा करावा, यासाठी आम्ही लढा उभारला आहे या मागणीसाठी आता थेट राष्ट्रपतींना भेटणार आहोत.

ते म्हणाले, सध्या राज्यात आणि केंद्रातील सरकार विकास, महागाई, टंचाई, बेरोजगारी हे मुद्दे सेाडून एकमेकांची उणी-धुणी काढण्यात मश्गुल आहे आरेाप-प्रत्यारोप करून एकमेकांना तुरुंगात टाकून चौकशाी लावण्यातच आपला वेळ खर्ची करित आहेत. त्यांना सर्वसामान्य लोकांकडे पाहण्यासाठी वेळच नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news