हरियाणा : पुढारी ऑनलाईन : हरियाणा येथील कर्नाल पोलिसांनी मोठी कारवाई करत ४ संशयित दहशतवाद्यांना आज ( दि. ५ ) ताब्यात घेतले. संशयितांकडून स्फाेटकांचा माेठा साठा जप्त करण्यात आला आहे. पंजाब आणि हरियाणा पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. पोलिसांना एक पावडरची पिशवी मिळाली असून, ती आरडीएक्स असल्याचा संशय आहे.
कर्नाल एसपी गंगाराम पूनिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित ४ दहशतवाद्यांपैकी तिघांना फिरोजपूर आणि एकाला लुधियाना येथील बस्तारा टोल प्लाझाजवळ ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून इतर शस्त्रास्त्रांसह स्फोटके जप्त केली आहेत. तर गुरप्रीत, अमनदीप परमिंदर आणि भूपिंदर अशी तिघा तीन दहशतवाद्यांची नावे आहेत. याशिवाय आणखी एका पाकिस्तानमधील दहशतवादी याच्या संपर्कात असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
दहशतवादी पंजाबमधील फिरोजपूर येथून स्फोटके घेवून महाराष्ट्रातील नांदेड येथे पोहोचवणार होते. याच दरम्यान, पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, ३१ जिवंत काडतुसे, मोठ्या प्रमाणात स्फोटके, गनपावडर (आरडीएक्स), तीन कंटेनर, १ लाख ३१ हजार रुपयांची राेकड आणि ६ माेबाईल फाेन जप्त केले आहे. चारही दहशतवादी बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) संघटनेशी संबधित आहेत. त्यांना पाकिस्तानमधून ड्राेनच्या मदतीने स्फाेटके मिळल्याची असल्याची माहिती प्राथमिक चाैकशीत मिळत आहे, अशी माहिती हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी दिली.
हेही वाचलंत का?