NEET Paper Leak | गैरप्रकाराच्या एकूण १५३ घटना - NTAची सर्वोच्च न्यायालयात कबुली

एकूण १६ गुन्हे दाखल झाल्याची NTAची माहिती
153 cases of unfair means reported: NTA to Supreme Court
Supreme Court
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) सर्वोच्च न्यायालयात National Eligiblity Entrance Test Undergraduate (NEET - UG) 2024 या परीक्षेत गैरप्रकाराचे एकूण १५३ प्रकार आढळले असल्याचे सांगितले आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर पेपर फुटल्याचे दाखवण्यासाठी जो व्हिडिओ दाखवला जात आहे, त्यात फेरफार करण्यात आल्याचेही NTAने म्हटले आहे.

टेलेग्रामवर ४ मे रोजी पेपर फुटल्याचे दाखवणारा जो व्हिडिओ आहे, त्यात छेडछाड करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका आधीच फुटली होती, असा बनवा करण्याच्या हेतूने ही छेडछाड करण्यात आली होती, असे NTAने म्हटले आहे. बार अँड बेंचने ही माहिती दिली आहे.

54 विद्यार्थी तीन वर्षांसाठी डीबार - NTA

NTAला गैरप्रकाराचे एकूण १५३ प्रकार दिसून आले आहेत. ही प्रकार संबंधित समितीपुढे सादर करण्यात आले. त्यानंतर ८१ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत, तर ५४ विद्यार्थ्यांना ३ वर्षांसाठी डिबार करण्यात आले आहे, असे NTAने म्हटले आहे. तसेच या प्रकरणात एकूण १६ FIR दाखल झाल्याचे सांगण्यात आले आहे.

NEET-UGची परीक्षा ५ मे रोजी घेण्यात आली. या परीक्षेचा पेपर फुटला होता हे सर्वोच्च न्यायालयाने मान्य करत या प्रकरणी म्हणणे मांडण्याची सूचना NTAला दिली होती. त्यानुसार पेपर फुटीचे प्रकार कोठे घडले, याचा कोणत्या विद्यार्थ्यांना लाभ झाला, याची माहिती देण्यास सांगण्यात आले. या आदेशानुसार NTAने हे म्हणणे सादर केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news