अद्भूत महाकुंभमेळा | पहिल्या दिवशी १.५० कोटी भाविकांचे त्रिवेणी संगमात पवित्र स्नान

Maha Kumbh 2025 | पुढील ४५ दिवस सुरू राहणार 'महाकुंभ'
Maha Kumbh 2025
Maha Kumbh 2025 | अद्भूत महाकुंभमेळा | पहिल्या दिवशी १.५० कोटी भाविकांचे त्रिवेणी घाटावर पवित्र स्नानMahaKumbh 2025 'X'
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: प्रयागराजमध्ये (उत्तर प्रदेश) आजपासून (दि.१३) महाकुंभ मेळ्यास (Prayagraj Maha Kumbh 2025) प्रारंभ झाला. आज दिवसभरात १.५० कोटी भाविकांनी गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले. पुढील ४५ दिवस म्हणजे २६ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महाकुंभमेळ्यात सुमारे ४० कोटींहून अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले संत, भक्तांचे अभिनंदन

उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया एक्स अकाऊंटवरून पोस्ट करत महाकुंभ मेळ्याची अपडेट शेअर केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "मानवतेच्या पवित्र पर्व 'महाकुंभ २०२५' मध्ये 'पौष पौर्णिमे'च्या शुभ प्रसंगी संगमात स्नान करण्याची संधी मिळालेल्या सर्व संत, कल्पवासी, भक्तांचे हार्दिक अभिनंदन".

पहिल्या दिवशी १.५० कोटी भक्तांचे पहिले स्नान

१४४ वर्षांनी दुर्मिळ संयोग जूळून आलेल्या 'महाकुंभमेळा २०२५' ची सुरुवात आज प्रयागराजमध्ये पौष पौर्णिमेच्या पहिल्या स्नानाने झाली. आज पहिल्या स्नान महोत्सवात, १.५० कोटी भक्तांनी अखंड आणि स्वच्छ त्रिवेणीत स्नान करण्याचा लाभ घेतला, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

CM योगींनी मानले सर्वांचे आभार

मुख्यमंत्री योगी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, "महाकुंभमेळा प्रशासन, प्रयागराज प्रशासनाने पहिला स्नान महोत्सव यशस्वीरित्या पूर्ण करण्यात सहभाग घेतला. याबद्दल उ. प्रदेश पोलीस, महाकुंभ संबंधित केंद्र आणि राज्य सरकारचे सर्व विभाग, प्रयागराज महानगरपालिका, स्वच्छाग्रही, गंगा सेवादूत, कुंभ सहाय्यक, धार्मिक-सामाजिक संस्था, विविध स्वयंसेवी संस्था आणि माध्यम जगतातील मित्रांचा समावेश आहे. त्यांचे मनापासून आभार !"

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news