बंगळूर क्राईम : ४ राष्ट्रीय जलतरणपटूंचा नर्सवर सामूहिक अत्याचार | पुढारी

बंगळूर क्राईम : ४ राष्ट्रीय जलतरणपटूंचा नर्सवर सामूहिक अत्याचार

पुढारी ऑनलाईन डेस्क :दिल्लीतील राष्ट्रीय स्तरावरील ४ जलतरणपटूंनी एका खासगी रुग्णालयातील नर्सवर सामूहिक अत्याचार केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या जलतरणपटूंना बंगळूरच्या संजयनगर पोलिसांनी अटक केलेली आहे. मंगळवारी पीडित नर्सने या खेळाडुंच्या विरोधात तक्रार दाखल केलेली, ज्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पीडिता ही पश्चिम बंगालची रहिवाशी आहे. (बंगळूर क्राईम)

पीडितेच्या आरोपानुसार २४ मार्च रोजी तिच्यावर बलात्कार झाला होता. डेटिंग अ‍ॅपद्वारे रजत नावाच्या मुलाशी तिची मैत्री झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना आपले मोबाईल नंबर दिले. त्यानंतर दोघांचे संभाषण होत राहिले. अशातच एकदा पीडितेला रजतने हॉटेलवर जेवणाचे आमंत्रण दिले. त्यानंतर तो पीडितेला रुमवर घेऊन गेला. (बंगळूर क्राईम)

त्या रुममध्ये अगोदरपासूनच रजतचे तीन मित्र होते. पीडिता जेव्हा रजतसोबत रुममध्ये पोहोचली, तेव्हा तिच्यावर चौघांनी सामूहिक बलात्कार केला. चारही आरोपींचे वय २० ते २५ वर्षांदरम्यान आहे. रजत, शिव राणा, देव सरोहा आणि योगेश कुमार अशी आरोपींची नावे आहेत. हे चारही जलतरणपटू दिल्लीतील रहिवाशी आहेत. हे चौघे जण बंगळूरमध्ये ट्रेनिंग घेत होते. त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी त्वरीत अटक केली. (बंगळूर क्राईम)

Back to top button