तब्बल दोन वर्षांनंतर नियमित आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांना प्रारंभ | पुढारी

तब्बल दोन वर्षांनंतर नियमित आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांना प्रारंभ

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात शनिवारी मध्यरात्रीपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सुमारे दोन वर्षांच्या कालावधीनंतर नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाली आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद केली होती. पुन्हा सुरू झालेल्या प्रवासामध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सांगितले की, आंतरराष्ट्रीय उड्डाणांशी संबंधित विद्यमान कोरोना मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करण्यात आला आहे. सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार विमानामध्ये तीन जागा रिक्त ठेवण्याचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. क्रू मेंबर्ससाठी पीपीई किटचे निर्बंधही दूर करण्यात आले आहेत. विमानतळावरील सुरक्षा कर्मचार्‍यांकडून नियोजित पॅट डाउन तपासणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. विमानतळ किंवा विमानात मास्क घालण्याची अनिवार्यता कायम राहणार आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button