Punjab : जे बोलले ते केले, २५ हजार सरकारी नोकऱ्या देण्याचा भगवंत मान यांचा निर्णय | पुढारी

Punjab : जे बोलले ते केले, २५ हजार सरकारी नोकऱ्या देण्याचा भगवंत मान यांचा निर्णय

चंदिगढ ; पुढारी वृत्तसेवा : पंजाबमध्ये आपचे सरकार आल्यानंतर मुख्यंमंत्री भगवंत मान यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यानंतर पुर्ण मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. आज मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या उपस्थितीत पहिली मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. (Punjab)

या बैठकीत काही लोकहिताचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये पहिला निर्णय २५ हजार सरकारी नौकऱ्या देण्याचा घेण्यात आला. यातील १० हजार पोलिस विभागाच्या जागा भरण्यात येणार असल्याचे या बैठकीत निर्णय घेण्यात आला. तर १५ हजार नौकऱ्या विविध विभागात निघणार असल्याचे सांगण्यात आले.

पुढल्या महिन्यात याची जाहीरात निघणार असल्याचे ही या बैठकीत सांगण्यात आले. मुंख्यमंत्री भगवंत मान यांनी निवडणूक प्रचारा दरम्यान आम्ही युवकांना रोजगार देणार असल्याचे पहिले आश्वासन पाळले आहे. मान यांनी प्रचारा दरम्यान या घोषणा केल्या होत्या.

मुख्यमंत्री मान यांच्या मंत्रिमंडळात दहा नव्या चेहऱ्यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे. याच्या तीन दिवस आधी शहीद भगतसिंग यांच्या गावात भगवंत मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. चंदीगड येथील पंजाब भवन येथे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

punjab : 10 मंत्र्यांपैकी आठ पहिल्यांदाच आमदार

या 10 मंत्र्यांपैकी आठ पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. तर या सर्वांनी पंजाबी भाषेत शपथ घेतली. हरपाल सिंग चीमा आणि गुरमीत सिंग मीत हरे हे दोन वगळता इतर आठ जण पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. दिरबाचे आमदार, चीमा यांनी प्रथम शपथ घेतली, त्यानंतर मंत्रिमंडळातील एकमेव महिला आणि मलोतच्या आमदार डॉ. बलजीत कौर यांनी शपथ घेतली.

त्यापाठोपाठ जंदियाला येथून हरभजन सिंग, मानसातून डॉ. विजय सिंगला, भोवा येथून लाल चंद, बरनाळा येथून गुरमीत सिंग मीत हेअर, अजनाळा येथून कुलदीप सिंग धालीवाल, पट्टीतून लालजीत सिंग भुल्लर, होशियारपूरमधून ब्रह्म शंकर झिम्पा आणि आनंदपूरमधून हरजोत सिंग बैंस यांचा समावेश आहे.

मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह १८ जणांचा समावेश आहे. हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान या शपथविधी सोहळ्यास उपस्थित होते. पंजाबचे राज्यपाल पुरोहित यांनी बुधवारी स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांचे मूळ गाव असलेल्या खटकर कलान येथे भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.

Back to top button