पंतप्रधानांनी घेतली जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांची भेट | पुढारी

पंतप्रधानांनी घेतली जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांची भेट

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आज, शनिवारी दिल्ली दौऱ्यावर आहेत. १४ व्या भारत-जपान शिखर संमेलनात ते उपस्थित राहतील. दरम्यान किशिदा यांनी हैद्राबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेतली. युक्रेन संकट, चीन, गुंतवणूक तसेच दोन्ही देशांमध्ये आर्थिक सहकार्य वाढवण्यासंबंधी उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रासंबंधी देखील बैठकीत चर्चा झाल्याचे कळतेय.

जपानच्या सागरी सीमेत रशियाच्या हवाई दलासह संयुक्त हवाई अभ्यास तसेच सुलु सागर क्षेत्रात फिलिपीन्सच्या अधिकारक्षेत्रात युद्धनौका पाठवण्यासंबंधी उभय नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाल्याचे कळतेय. उद्या,२० मार्चला किशिदा कंबोडिया दौऱ्यावर रवाना होतील.
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) तसेच जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांच्या दरम्यान होणारी भेट आसाममधील नागरिकता सुधारणा कायदा संबंधी सुरु असलेल्या विरोध प्रदर्शनामुळे स्थगित करण्यात आली होती. किशिदा यांचा दौरा याच कार्यक्रमांचा भाग आहे.

रशियाने युक्रेनवर केलेली लष्करी कारवाई विरोधात जपानने रशियावर आर्थिक प्रतिबंध घालण्याची घोषणा केली आहे. तर, भारताकडून यासंबंधी कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. संयुक्त राष्ट्र बैठकीत भारताने रशिया विरोधात मतदान केले नव्हते. अशात जपान-भारत महत्वाची चर्चा झाल्याचे कळतेय. भारतातून जपानमध्ये मुख्यत: कपडे, लोखंड तसेच स्टील प्रोडक्ट्स, पेट्रोलियम उत्पादन, टेक्सटाईल यार्न, फेब्रिक्स तसेच मशीनरी निर्यात केली जाते. तर, प्लास्टिक, इलेक्ट्रिक मशीनरी, लोखंड, स्टील प्रोडक्ट्स, वाहनाचे खुले पार्ट, ओर्गेनिक केमिकल्स तसेच धातूची जपानमधून आयात केली जाते. गेल्या १९ वर्षात भारतात जपानी गुंतवणूक ३२ बिलीयन डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे, हे विशेष.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : ‘झुंड’ मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie

Back to top button