समुद्रात ६ हजार मीटर खोलीवर संशोधन; जीवन उत्पत्तीचे गूढ उकलणार! | पुढारी

समुद्रात ६ हजार मीटर खोलीवर संशोधन; जीवन उत्पत्तीचे गूढ उकलणार!

नवी दिल्ली :. आहेत. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात संशोधक समुद्रात 500 मीटर खोलीवर जाऊन खास या मोहिमेसाठी विकसित केलेल्या उपकरणांची चाचणी घेतील. त्यानंतर पुढील दिशा स्पष्ट होणार आहे. या मोहिमेचा अपेक्षित खर्च 4 हजार 77 कोटी रुपये इतका आहे. गेल्यावर्षीच केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला हिरवा कंदील दाखविला आहे.

मोहिमेचे महत्त्व

विज्ञानाने कितीही प्रगती केली असली, तरी अद्याप खोल समुद्राचा जवळपास 95.8 टक्के भाग मानवासाठी रहस्यच आहे. 6 हजार मीटर खोलीवर अनेक प्रकारची खनिजे आहेत. मात्र, त्याबाबत अद्याप संशोधन झालेले नाही. डीओेएमअंतर्गत हे काम होईल.

तंत्रज्ञानाला चालना देणारी मोहीम

डीओेएम या मोहिमेसाठी अकॉस्टिक फोन, उच्चदाबाच्या क्षेत्रात कार्यरत राहणारी उपकरणे तसेच रिसर्च वेसल्स अशा आधुनिक बाबींची आवश्यकता आहे. हे तंत्रज्ञान व्यवसायिकद‍ृष्ट्या सध्या उपलब्ध होत नाही. त्यामुळे ते स्वदेशात काही खासगी कंपन्यांच्या सहकार्याने विकसित करण्यासाठी आगामी काळात पावले उचलली जातील.

रोजगारनिर्मिती शक्य

सागरी जीवशास्त्र क्षेत्राची क्षमता विकसित करणे, हाही या मोहिमेचा महत्त्वाचा उद्देश असून, संबंधित क्षेत्राशी निगडित भारतीय कंपन्यांत या अनुषंगाने रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्‍वासही सरकारला आहे.

जीवनाच्या उत्पत्तीसंदर्भात अनेक गोष्टींचे गूढ अद्याप कायम आहे. या मोहिमेमुळे आम्हाला त्याचा शोध घेणे, ते कसे अस्तित्वात आले आणि कसे जिवंत राहिले, याबद्दल जाणून घेता येईल. खनिज आणि धातूंनी समृद्ध अशा या भागाचे वास्तवदर्शी चित्र उभे करण्यासही यामुळे मदत मिळेल.
– एम. रविचंद्रन, सचिव, पृथ्वी विज्ञान मंत्रालय

Back to top button