Agniveer Data Breach : धक्‍कादायक..! अग्निवीरांचा डेटा चोरून डार्क वेबवर विकण्याचा प्रयत्न; १४ वर्षीय मुलगा ताब्यात

डार्क वेबवर जाहिरात प्रसिद्ध करुन ४,००० अग्निवीरांची माहिती आपल्याकडे असल्याचा केला होता दावा
Agniveer Data Breach
प्रातिनिधिक छायाचित्र.Agniveer Data BreachPudhari Photo.
Published on: 
Updated on: 

Agniveer Data Breach : हरियाणात एक धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. बल्लभगढ येथील १४ वर्षांच्या एका मुलाला दिल्ली पोलिसांच्या 'स्पेशल सेल'ने ताब्यात घेतले आहे. त्‍याने 'अग्निवीर' जवानांशी संबंधित डेटा 'डार्क वेब'वर ५०० डॉलर्सला विकण्याचा प्रयत्न केल्‍याचे तपासात समोर आले आहे.

टेस्ट साईट गैरवापर करुन मिळवली माहिती

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन मुलाने एका चाचणी वेबसाईटचा (टेस्ट साईट) गैरवापर करून ही माहिती मिळवली. माजी अग्निवीरांनी नोंदणी करावी आणि इतर सरकारी विभागांतील रिक्त पदांसाठी अर्ज करता यावा, या उद्देशाने ही वेबसाईट तयार करण्यात आली होती.

Agniveer Data Breach
Agniveer service extension : २५% अग्निवीर नियमित सैनिक बनणार, ७५% जणांना दोन वर्षांची सेवा मुदतवाढ मिळणार

डार्क वेबवर जाहिरात प्रसिद्ध केली

तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, संबंधित मुलाने डार्क वेबवर एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये त्याने सुमारे ४,००० अग्निवीरांची माहिती आपल्याकडे असल्याचा दावा करत ती ५०० डॉलर्समध्ये विक्रीस काढली होती. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) साधनांचा वापर करून हा डेटा मिळवण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.

Agniveer Data Breach
Agniveer Permanent Job: सैन्यात ६ वर्षे सेवा दिली तरी अग्नीवीरांना 'कायम' नोकरी मिळणे सोपे नाही.. मार्ग अजूनही खडतर

वेबसाईटवरुन चोरली माहिती खरी की बनावट याचा तपास सुरु

दिल्ली पोलिसांच्या 'इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स' (आयएफएसओ) पथकाने या मुलाच्या डिजिटल उपकरणांवरून हा डेटा जप्त केला आहे. वेबसाईटवरून चोरण्यात आलेली माहिती खरी आहे की बनावट, याची सध्या पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे. तसेच, जप्त केलेल्या माहितीची सत्यता तपासण्यासाठी आणि मूळ नोंदींशी पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला पत्र पाठवून अग्निवीरांचा अधिकृत डेटा मागवला आहे.

Agniveer Data Breach
Agniveer government jobs Maharashtra|अग्निवीरांना शासकीय नोकरीत थेट संधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

प्राथमिक चौकशीनंतर मुलाला देण्‍यात आले कुटुंबीयांच्‍या ताब्‍यात

कायदेशीर प्रक्रियेनुसार या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. प्राथमिक चौकशीनंतर त्याला त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. डेटा चोरीची व्याप्ती नेमकी किती आहे आणि मिळालेली माहिती अधिकृत नोंदींशी जुळते का, याचा पुढील तपास सुरू आहे.लष्कर, नौदल आणि हवाई दलात चार वर्षांच्या कालावधीसाठी जवानांची भरती करण्याकरिता केंद्र सरकारने जून २०२२ मध्ये 'अग्निपथ' योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत निवड झालेल्या जवानांना 'अग्निवीर' म्हणून ओळखले जाते आणि संबंधित दलात रुजू होण्यापूर्वी त्यांना लष्करी प्रशिक्षण दिले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.