हिजाब प्रकरण : “हिजाब हे केवळ परिधान करण्याचं कापड नाही”

हिजाब प्रकरण : “हिजाब हे केवळ परिधान करण्याचं कापड नाही”

बंगळुर, पुढारी ऑनलाईन :   "हिजाब हा इस्‍लाममध्‍ये अनिवार्य नाही. शाळा आणि महाविद्‍यालयातील विद्यार्थ्यांना शाळेच्‍या गणवेषास विरोध करता येणार नाही", असा निर्णय  कर्नाटक उच्च न्यायालयाने (हिजाब प्रकरण) आज दिला. यावर मेहबुबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला, असदुद्दीन ओवैसी आणि मुरगेश निराणी यांनी आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर नोंदविल्या आहेत. पाहुयात कोण काय म्हणाले ते…

कर्नाटक न्यायालयचा निर्णय निराशाजनक : मेहबुबा मुफ्ती

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, "हिजाब प्रकरणातील कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय निराशाजनक आहे. एकीकडे आम्हा महिलांच्या सशक्तीकरणाच्या गोष्टी बोलल्या जातात, तरीही आपण त्यांना एका सामान्य अधिकारापासून वंचित करत आहोत. ही बाब केवळ धर्माशी संबंधित नाही. तर निवडीच्या स्वातंत्र्याचा मुद्दा आहे." (हिजाब प्रकरण)

कोर्टाचा निर्णयाने नाराज झालाे : ओमर अब्दुल्ला

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्‍हटलं आहे की, "मी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाने खूप नाराज झालो आहे. तुम्ही हिजाबवर काहीही विचार करत असाल; पण हिजाब हा केवळ पेहराव करण्याचं कापड नाही. कोर्टाने मूलभूत हक्क आबाधित ठेवलेला नाही. "

न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो : मंत्री मुरूगेश निराणी  

"मी उच्‍च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. सर्वांनी या आदेशाचे पालन आणि सन्मान केला पाहिजे. त्याचबरोबर सांप्रदायिक सौहार्द राखलं पाहिजे. कोणत्याही विद्यार्थ्याला भडकवून शैक्षणिक वातावरण ढवळण्याचा प्रयत्न करता कामा नये. आपण सर्वांनी मिळून आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करू."

न्यायालयात गेलेल्या विद्यार्थिनींनी निर्णयाचे पालन करावे : बी. सी. नागेश

"मला आनंद आहे की, कर्नाटक न्यायालयाने सरकारच्या विचारांचे आणि उद्दिष्टांना अखंडित ठेवले. मी न्यायालयात गेलेल्या विद्यार्थिनींना विनंती करतो की, न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पालन करा. इतर कोणत्याही मुद्द्याशिवाय शिक्षण ही फार मोठी बाब आहे."

हे वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news