RBI चा paytm बँकेला मोठा झटका, घातली ‘ही’ बंदी!

RBI चा paytm बँकेला मोठा झटका, घातली ‘ही’ बंदी!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (paytm payment bank)वर मोठी कारवाई केली आहे. ज्या अंतर्गत आता पेटीएम बँक नवीन ग्राहक जोडू शकणार नाही. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 35A अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या आदेशात, आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला आयटी ऑडिट फर्मची नियुक्ती करण्यास सांगितले जेणेकरुन त्यांच्या आयटी सिस्टमचे सर्वसमावेशक सिस्टम ऑडिट केले जावे. ही बंदी किती काळासाठी आहे यावर आरबीआयने काहीही सांगितलेले नाही.

आरबीआयने म्हटले आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकेने, , इतर गोष्टींबरोबरच, आपल्या अधिकारांचा वापर करून, Paytm Payments Bank Ltd. ला तात्काळ प्रभावाने, नवीन ग्राहकांना जोडण्यास मनाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला आयटी प्रणालीचे सर्वसमावेशक सिस्टम ऑडिट करण्यासाठी आयटी ऑडिट फर्म नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. आरबीआयने आपल्या आदेशात म्हटले आहे की पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड आता आयटी ऑडिटर्सच्या अहवालाचे पुनरावलोकन केल्यानंतर आरबीआयकडून परवानगी मिळाल्यानंतरच नवीन ग्राहक जोडू शकेल.

जेव्हा आयटी ऑडिट फर्म आपल्या सिस्टमचे संपूर्ण पुनरावलोकन करेल, तेव्हा ती त्याच्या अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेईल. तोपर्यंत पेटीएम पेमेंट्स बँक कोणतेही नवीन ग्राहक जोडू शकणार नाही. याशिवाय जुन्या ग्राहकांवर या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही, त्यांनी नियमानुसार काम सुरू ठेवावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

आयटी ऑडिट म्हणजे काय?

आयटी ऑडिट म्हणजे एक टीम पेटीएम पेमेंट्स बँकेची प्रणाली तपासेल. तसेच, त्यांची यंत्रणा किंवा सॉफ्टवेअर किती ग्राहकांचा बोजा उचलण्यास सक्षम आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय त्यात काय अडचण आहे? जर कंपनी ऑडिटमध्ये अपयशी ठरली तर तिच्यावरील ही बंदी कायम राहील.

स्मॉल फायनांस बँक योजना…

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेटीएम पेमेंट्स बँकेने स्मॉल फायनान्स बँक सुरू करण्याची योजना आखली आहे. जर सर्व काही ठीक झाले तर, कंपनी या वर्षी जूनपर्यंत आरबीआयकडे परवान्यासाठी अर्ज करेल. नियमांनुसार, पेमेंट बँक पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतरच लघु वित्त बँक परवान्यासाठी अर्ज करू शकते. मे पर्यंत पेटीएम हे निकष पूर्ण करेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news