पुढारी ऑनलाईन डेस्क
श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा पथकावर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात एका नागरिक ठार झाला असून, पोलिस कर्मचार्यांसह २३ जण जखमी झाले आहेत. आज सायंकाळी झालेल्या स्फोटाने परिसरात एकच खळबळ माजली. सुरक्षा दलांच्या जवानांनी तत्काळ परिसराची नाकाबंदी केली. युद्ध पातळीवर शोध मोहिम सुरु आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
अमीरा कदल परिसरात हा ग्रेनेड हल्ला झाला. या हल्ल्यानंतर जवानांनी शोध मोहिम राबवली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीपैकी एका महिलेची प्रकृती चिंतानजक असून अन्य जखमींची प्रकृती स्थिर आहे. घटनेनंतर सुरक्षादलाने परिसरात नाकेबंदी केली आहे. तर जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी पूर्ण ताकदीनं सुरक्षा दलाचे जवान काम करत आहेत.
हेही वाचा :