परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांचे खासदारांना पत्र | पुढारी

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांचे खासदारांना पत्र

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : रशिया-युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतातील जवळपास सर्व राज्यातील विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. युद्धभूमीत अडकलेल्या भारतीय विद्यार्थांचे पालक घाबरले आहेत. पालक हे प्रशासनाला तसेच स्थानिक खासदारांना फोन करून त्यांच्या मुलांना सुखरूप मायदेशात आणण्याची विनवणी करीत आहेत. परराष्ट्रमंत्री डॉ.एस.जयशंकर यांनी यासंबंधी परराष्ट्र मंत्रालयासोबत संपर्कात राहण्याची सूचना खासदारांना दिल्‍या आहेत. शिवाय कुटुंबियांच्या चिंतेसंबंधीची माहिती पुरवण्याचे निर्देश देखील खासदारांना देण्यात आले आहे.

युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थांची चौकशी आणि सूचनेकडे भारताचे लक्ष दिले जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून सर्वांसोबत संपर्क सुरू आहे, असे डॉ.जयशंकर यांनी आपल्‍या पत्रातून सांगितले आहे. यासंबंधी एक ई-मेल आयडी तसेच व्हॉट्सअँप क्रमांकही पत्रातून खासदारांना कळवण्यात आला आहे. या क्रमांकावरून खासदार विद्यार्थांच्या कुटुंबियासंबंधीची माहिती पोहचवू शकतील, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केले आहे. सर्वाधिक वैद्यकीय शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी युद्धभूमीत अडकून पडले असल्याचे जयशंकर म्हणाले. युक्रेनमधून रोमानिया, पोलंड, हंगेरी तसेच स्लोवाकियात येणाऱ्यांना भारतीयांसाठी येथील भारतीय दुतावासाकडून वेगवेगळे हेल्पलाईन सुरू करण्यात आल्याचे देखील जयशंकर यांनी या पत्रातून कळवले आहे.

हेही वाचा 

Back to top button