देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, २४ तासांत १३ हजार नवे रुग्ण, ३०२ मृत्यू

देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, २४ तासांत १३ हजार नवे रुग्ण, ३०२ मृत्यू
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १३ हजार १६६ नवे रुग्ण (new COVID19 cases) आढळून आले आहेत. तर ३०२ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २६,९८८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात १ लाख ३४ हजार २३५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दैनंदिन कोरोना संसर्ग दर १.२८ टक्के (Daily positivity rate) आहे. आतापर्यंत देशातील ४ कोटी २२ लाख ४६ हजार ८८४ रुग्णांनी कोरोनावर (Total recoveries) मात केली आहे. तर एकूण ५ लाख १३ हजार २२६ जणांचा बळी घेतला आहे.

याआधीच्या दिवशी १४ हजार १४८ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ३०२ रूग्णांचा मृत्यू झाला होता. दरम्यान ३० हजार ९ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. गुरूवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.४६ टक्के नोंदवण्यात आला होता. तर, दैनंदिन कोरोना संसर्ग दर १.२२ टक्के आणि आठवड्याचा कोरोना संसर्ग दर १.६० टक्के नोंदवण्यात आला होता.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १७६ कोटी ८६ लाख ८९ हजार २६६ डोस देण्यात आले आहेत. यातील ३२ लाख ४ हजार डोस गुरुवारी दिवसभरात देण्यात आले. खबरदारी म्हणून आतापर्यंत १.९५ कोटी बूस्टर डोस लावण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून आतापर्यंत पुरवण्यात आलेल्या १७२ कोटी ९८ लाख २९ हजार ३७० डोस पैकी १० कोटी ७९ लाख ७५ हजार २७२ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक असल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

देशात आतापर्यंत ७६ कोटी ३५ लाख ६९ हजार १६५ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील १० लाख ३० हजार १६ कोरोना तपासण्या बुधवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news