कोरोना रुग्ण घटले पण मृत्यूंच्या संख्येत वाढ! २४ तासांत १४ हजार नवे रुग्ण, ३०२ मृत्यू | पुढारी

कोरोना रुग्ण घटले पण मृत्यूंच्या संख्येत वाढ! २४ तासांत १४ हजार नवे रुग्ण, ३०२ मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क

कोरोना महारोगराईची तिसरी लाट जवळपास ओसरली आहे. देशातील रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. पण मृत्यूंच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १४,१४८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३०२ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३० हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णसख्या १ लाख ४८ हजारांपर्यंत खाली आली आहे. आतापर्यंत देशातील ४ कोटी २२ लाख १९ हजार ८९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ५ लाख १२ हजार ९२४ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दैनंदिन पाॅझिटिव्हिटी रेट १.२२ टक्क्यांवर आला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट नोंदवण्यात आली होती. पंरतु, गेल्या बुधवारी दैनंदिन कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सौम्य वाढ नोंदवण्यात आली होती. बुधवारी दिवसभरात १५ हजार १०२ कोरोनाबाधित आढळले होते. तर,२७८ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, ३१ हजार ३७७ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. मंगळवारी १३ हजार ४०५ कोरोनाबाधित आढळले होते. बुधवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.४२ टक्क्यांवर पोहचला. तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर १.२८ टक्के आणि आठवड्याचा कोरोनासंसर्गदर १.८० टक्के नोंदवण्यात आला.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १७६ कोटी ५२ लाख ३१ हजार ३८५ डोस देण्यात आले आहेत. यातील ३३.८४ लाख डोस मंगळवारी दिवसभरात देण्यात आले. दरम्यान, १.९३ कोटी बूस्टर डोस देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारकडून आतापर्यंत पुरवण्यात आलेल्या १७२ कोटी ६८ लाख ९० हजार ४०० डोस पैकी १० कोटी ९८ लाख ५७ हजार ८३२ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.देशात आतापर्यंत ७६ कोटी २४ लाख १४ हजार १८ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ११ लाख ८३ हजार ४३८ तपासण्या मंगळवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

Back to top button