दहावी, बारावी परीक्षेसंदर्भातील याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी | पुढारी

दहावी, बारावी परीक्षेसंदर्भातील याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दहावी, बारावीच्या वार्षिक परीक्षा (X, XII th Annual Examination) फिजिकल पध्दतीने घेतल्या जाऊ नयेत, अशा विनंती करणार्‍या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (दि.२३) सुनावणी होणार आहे. देशातील पंधरापेक्षा जास्त राज्यांची परीक्षा मंडळे, आयसीएससी तसेच सीबीएससी मंडळाकडून फिजिकल पध्दतीने परीक्षा घेण्याची तयारी सुरु आहे, पण कोरोना संकटामुळे परीक्षा फिजिकल पध्दतीने घेऊ नयेत, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या दृष्टीकोनातून अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महत्वपूर्ण ठरेल : शरद पवार

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भातील  याचिकांवर न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ सुनावणी घेणार आहे. आगामी बोर्ड परीक्षेसाठी वैकल्पिक मूल्यांकन पद्धतीचा अवलंब करावा, अशी विनंती याचिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केली आहे. गतवर्षी सीबीएसईसहित इतर मंडळे व राज्य मंडळांनी वैकल्पिक मूल्यांकन करून विद्यार्थ्यांचा निकाल दिला होता. याचिकेच्या प्रती सीबीएसई बोर्डाला देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

हेही वाचलं का?

Back to top button