घरबसल्या बदला ड्रायव्हींग लायसन्सवरचा पत्ता. जाणून घ्या प्रोसेस.. | पुढारी

घरबसल्या बदला ड्रायव्हींग लायसन्सवरचा पत्ता. जाणून घ्या प्रोसेस..

पुणे: पुढारी वृत्तसेवा

लायसन्सवरील पत्त्यामध्ये काही चूक असल्यास किंवा पत्ता बदलायचा असल्यास आता तूम्हाला आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. पत्त्यांमध्ये दुरूस्ती किंवा बदल तूम्ही स्वतः करू शकता. मोटार वाहन अधिनियम 1988 अंतर्गत, आरटीओ विभागाने वाहन चालकांना पत्ता स्वतः दुरुस्त करण्याची परवानगी दिली आहे. वाहन चालकांसाठी ड्रायव्हींग लायसन्स अत्यंत आवश्यक आहे. रस्त्यावर गाडी चालवताना लायसन्स नसल्यास 10 हजार रूपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. तसेच ड्रायव्हींग लायसन्स वरील सर्व माहित अचूक असणेही गरजेचे आहे. त्यामुळे वाहनचालकांसाठी ही चांगली बातमी आहे.

WI vs ENG : विंडीजच्या ‘या’ गोलंदाजाने 4 चेंडूत 4 बळी घेत इंग्रजांना लोळवले!

जर तूम्ही तुमचे निवासस्थान कायमचे बदलले असेल किंवा काही कालावधीसाठी इतर ठिकाणी रहात असाल, तर तूम्ही तुमच्या ड्रायव्हींग लायसन्सवरील पत्त्यामध्ये देखील बदल करणे आवश्यक आहे. यासाठी तूम्हाला दोन पर्याय देण्यात आले आहेत. तूम्ही आरटीओ कार्यालयात जाऊन पत्ता बदलू शकता किंवा तुमच्या मोबाईलवरून ऑनलाईनही पत्ता बदलू शकता. यासाठीचे शुल्क ऑनलाइन पध्दतीने भरावे लागेल.

परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी; हिंदुस्तानी भाऊच्या सांगण्यावरून १०-१२ वीचे विद्यार्थी रस्त्यावर

असा बदला पत्ता

  • रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • मग तुमचे राज्य निवडून अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करा. आता “ड्रायव्हिंग लायसन्सवरील सेवा” हा पर्याय निवडा.
  •  डायलॉग बॉक्समधील सूचना काळजीपूर्वक वाचा आणि कन्टिन्यू बटणावर क्लिक करा.
  • आता जुना ड्रायव्हिंग लायसन्स नंबर, जन्मतारीख, राज्य, आरटीओ इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरा आणि पुढे जा
  • आता समोर दिसणारे सर्व बॉक्स भरून पत्ता बदलण्यासाठी पुढे जा बटणावर क्लिक करा.
  • आता सूचीमधून ड्रायव्हिंग लायसन्स सेवा बदला हा पर्याय निवडा.
  • नवीन ड्रायव्हिंग लायसन्समध्ये तुम्हाला जो पत्ता बदलायचा आहे तो पत्ता टाका आणि कॅप्चा कोड टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.

Election Commission : जाहीर सभांसाठी पाचशेऐवजी एक हजार लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी

दुसऱ्या पानावर तुम्हाला अॅप्लिकेशन नंबर दिसेल, तुम्ही तो पुढील वापरासाठी प्रिंट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट बटणावर क्लिक करा.

  • आता जुन्या ड्रायव्हिंग लायसन्सची आणि अॅड्रेस प्रूफची प्रत अपलोड करा.
  • अर्ज क्रमांक मिळाल्यानंतर, खाली जा आणि कागदपत्र अपलोड करण्यासाठीचा पर्याय निवडून सर्व कागदपत्र अपलोड करा.
  • आता शुल्क भरण्याच्या पर्यायावर क्लिक करून, ज्याद्वारे शुल्क भरणार आहात तो पर्याय निवडून शुल्क भरा.

कमी किंमतीत घ्या स्टायलिश स्पोर्टस् बाईक

पत्ता बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

फॉर्म 33 मध्ये अर्ज करण्यासाठी, तुमच्याकडे नोंदणी प्रमाणपत्र, नवीन पत्त्याचा पुरावा, चालू (वैध) विमा प्रमाणपत्र, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, फायनान्सरचे ना हरकत प्रमाणपत्र, पॅन कार्ड किंवा फॉर्म 60 आणि फॉर्म 61, चेसिस आणि इंजिन पेन्सिल प्रिंट या सर्व कागदपत्रांच्या सेल्फ अटेस्टेड म्हणजेच स्वतःची स्वाक्षरी असणाऱ्या प्रती आवश्यक आहेत.

Back to top button