मोहन भागवत म्हणाले, "CAA बद्दल कोणत्याही मुस्लिमांना अडचण नाही" - पुढारी

मोहन भागवत म्हणाले, "CAA बद्दल कोणत्याही मुस्लिमांना अडचण नाही"

गुहावटी, पुढारी ऑनलाईन : राष्ट्रीय स्वयं सेवकचे (RSS) प्रमुख मोहन भागवत आसामच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यामध्ये त्यांनी नागरिक सुधारणा विधेयक (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (NRC) चा मुद्दा उचलला आहे.

भागवत म्हणाले की, “राजकीय फायद्यासाठी जातीवादाला खतपाणी घातलं जात आहे. CAA बद्दल कोणत्याही मुस्लीम व्यक्तीला कोणतीच अडचण नाही. CAA-NRC च हिंदू-मुस्लीम विभाजनाशी काहीही संबंध नाही.”

“१९३० साली नियोजन करून मुस्लीमांची लोकसंख्या वाढविण्यासाठी एक मोहीम चालविण्यात आली. हे सत्य आहे की, पाकिस्तान तयार झाला. मात्र, आसाम, बंगाल, काॅरिडोर मागितला, तो मिळाला नाही. त्यामुळे लोकसंख्या वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले”, असे मत भागवतांनी मांडले.

RSS चे प्रवक्ता यांनी सांगितले की, “आसामच्या विभिन्न क्षेत्रांमधेये आणि अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि त्रिपूरा यांसारख्या राज्यांतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भागवत यांच्यासोबत बैठक घेतली.”

RSS शी संबंधित विषयांवर आणि कोरोना महामारीवर भागवत यांच्याशी चर्चा झाली. तसेच समाज आणि नागरिकांच्या कल्याणासंबंधित उपायांवर चर्चा करण्यात आली.

आसाम राज्यात भाजप दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर भागवत यांचा पहिला दौरा झाला. RSS चे प्रवक्त्यांनी सांगितले की, मोहन भागवत २२ जुलैला चैन्नईच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

पहा व्हिडीओ : “गंगेत तरंगणाऱ्या मृतदेहांची आपण माफी मागायला हवी”

हे वाचलंत का?

 

Back to top button