Corona updates : देशात २४ तासांत २ लाख ८६ हजार नवे रुग्ण, ५७३ जणांचा मृत्यू | पुढारी

Corona updates : देशात २४ तासांत २ लाख ८६ हजार नवे रुग्ण, ५७३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

Corona updates : देशातील कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ लाख ८६ हजार ३८४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ५७३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दिवसभरात ३ लाख ६ हजार ३५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात २२ लाख २ हजार ४७२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दैंनदिन पॉझिटिव्हिटी रेट १९.५९ टक्के आहे.

याआधीच्या दिवशी २ लाख ८५ हजार ९१४ नवे रुग्ण आढळून आले होते. तर ६६५ जणांचा मृत्यू झाला होता. दिवसभरात २ लाख ९९ हजार ७३ रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. दिलासादायक बाब म्हणजे दैंनदिन बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांचे प्रमाण अधिक आहे.

मध्ये प्रदेशात एका दिवसात ९,९६६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ८,६०४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर एका दिवसांत ८ लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. झारखंडमध्ये २४ तासांत १,००९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ५ जणांचा मृत्यू झाला आहे. हरियाणात एका दिवसांत ६,३५१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७ जणांना प्राण गमावावा लागला.

दक्षिण कोरियात ओमायक्रॉन वेगाने पसरला

दक्षिण कोरियात ओमायक्रॉन वेगाने पसरत आहे. गुरुवारी येथे १४ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. यामुळे येथील एकूण बाधितांची संख्या ७ लाख ७७ हजार ४९७ वर पोहोचली आहे.

ब्रिटनमध्ये निर्बंध हटवले

ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचा धोका कमी झाला आहे. यामुळे ब्रिटन सरकारने निर्बंध हटवले आहेत. बुस्टर डोसमुळे कोरोनामुळे गंभीर आजारी होण्याचा धोका कमी झाला आहे. तसेच रुग्णांलयात दाखल होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे ब्रिटन सरकारने म्हटले आहे.

Corona updates : मेक्सिकोत मृत्यूंचे प्रमाण अधिक

मेक्सिकोत कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. येथे आणखी ५३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ऑक्टोबर नंतर हा मृतांचा आकडा सर्वांधिक आहे.

Back to top button