Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझादांना पद्मभूषण मिळाल्याने काँग्रेसमध्ये दोन गट आमनेसामने

Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझादांना पद्मभूषण मिळाल्याने काँग्रेसमध्ये दोन गट आमनेसामने
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद ( Ghulam Nabi Azad ) यांना 'पद्मभूषण' पुरस्कार घोषित झाल्यानंतर काँग्रेसमधील दुफळी पुन्हा एकदा समोर आली आहे. काँग्रेसमध्ये बंडखोर मानले गेलेल्या जी-२३ गट आणि गांधी कुटुंबाचे समर्थन करणारा गट पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभा ठाकला आहे. यातून काँग्रेसमध्ये असणारी गटबाजी आणि दुफळी पुन्हा एकदा समोर आली आहे.

माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा ( Anand Sharma ) यांनी गुलाम नबी आझाद ( Ghulam Nabi Azad ) यांना 'पद्मभूषण' पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांनी ट्विट करुन लिहले आहे की, 'गुलाम नबी आझाद यांनी लोकसेवा आणि संसदीय लोकशाहीमध्ये आजीवन समृद्ध योगदान दिल्याबद्दल त्यांचे उचित सन्मान करण्यात आले आहे, याबद्दल त्यांचे अभिनंदन'.

यासह त्यांचे आणखी एक सहकारी कपिल सिब्बल ( kapil sibal ) यांनी देखिल गुलाब नबी आझाद ( Ghulam Nabi Azad ) यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणतात, अभिनंदन भाईजान, हे एक मोठं विडंबन आहे की, काँग्रेसला तुमच्या जनसेवेची आवश्यकता नाही. पण, राष्ट्राने तुमच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाचा स्विकार केला आहे.

काँग्रेसचे आणखी एक मोठे नेते राज बब्बर ( Raj Babbar ) यांनी देखिल एक सुंदर पोस्ट लिहली आहे, ' गुलाम नबी आझाद साहेब तुमचे अभिनंदन, आपण एक मोठ्या भावाप्रमाणे आहात. आपले निर्दोष सार्वजनिक जीवन आणि गांधीवादी आदर्शांवर असणारी आपली कटीबद्धता नेहमी प्रेरणा देत राहिल.' #PadmaBhushan राष्ट्रासाठी तुम्ही केलेली ५ दशकांहून अधिक काळातील सेवा ही एक आदर्श ओळख आहे.'

काँग्रेसच्या नेतृत्वाने या घोषणेवर आपली कोणतीही औपचारीक प्रतिक्रीया दिलेली नाही. पण, पद्म पुरस्कारांच्या विजेत्यांची यादी समोर आल्यावर काही वेळातच माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी 'गुलाम आझाद नही' असे म्हणत निशाणा साधला. जयराम रमेश यांनी बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य (Budhdev Bhattacharya) यांनी पद्मभूषण पुरस्कार स्विकार करण्यास दिलेल्या नकाराचा उल्लेख करत ट्वीट द्वारे म्हणाले, ' हे बरोबर आहे की, ते गुलाम नाहीत आझाद होऊ इच्छितात'.

माजी अधिकारी पी.एन. हाक्सर यांनी सुद्धा असेच पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यांनतर त्यांनी त्यांच्या पुस्तकात याबाबत लिहिले आहे. जयराम रमेश यांनी त्यांच्या पुस्तकातील काही भाग शेअर करत लिहले की, जानेवारी १९७३ मध्ये, आपल्या देशातील सर्वात मोठ्या अधिकाऱ्याला सांगण्यात आले की, पीएमओ ( प्रधान मंत्री कार्यालय) सोडल्यावर तुला पद्मविभूषण दिला जात आहे. यावर पीएन हाक्सर यांची प्रतिक्रिया होती, 'हे एक श्रेष्ठ अणि अनुकरण करण्या योग्य आहे.'

गुलाम नबी आजाद, कपिल सिब्बल आणि आनंद शर्मा हे सर्व काँग्रेस 'जी-२३' गटाचे सदस्य आहेत. यांनी २०२० मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांना पत्र लिहून काँग्रेसमध्ये आमुलाग्र बदल आणि परिवर्तन करण्याच्या सुचना केल्या होत्या. तसेच स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्यावर भर देण्याची मागणी केली होती. यानंतर काँग्रेसपक्षात मोठी दुफळी निर्माण झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news