मणिपूरमध्ये डबल इंजिन सरकारचे मोदींचे आवाहन - पुढारी

मणिपूरमध्ये डबल इंजिन सरकारचे मोदींचे आवाहन

नवी दिल्ली ः

मणिपूरच्या जलद विकासातील अडथळे दूर करण्यासाठी येथे डबल इंजिन सरकारचीच गरज आहे, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोर देत शुक्रवारी मणिपूरवासीयांना भाजपला मतदानाचे आवाहन केले. भाजपचे एन. बिरेन सिंग मणिपूरचे मुख्यमंत्री आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मणिपूरमध्ये शांतता नांदली. वारंवारच्या बंदमधून मणिपूरला मुक्‍ती मिळाली. हे सर्व एन. बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये झाले आहे. 70 वर्षे ज्यांनी या भागाकडे दुर्लक्ष केले त्यांना डोके वर काढू देऊ नका. मणिपूरच्या विकासातील अडथळे दुर झाले आहेत. जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा मणिपूर राज्यालाही 75 वर्षे पूर्ण होतील. दरम्यान, भाजपशासित मणिपूरमध्ये 60 जागांसाठी दोन टप्प्यात 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च रोजी मतदान होणार आहे.

Back to top button