देशात ८ दिवसात कोरोना रुग्णवाढीचा वेग सुसाट; २ लाख ७१ हजार २०२ बाधितांची नव्याने भर | पुढारी

देशात ८ दिवसात कोरोना रुग्णवाढीचा वेग सुसाट; २ लाख ७१ हजार २०२ बाधितांची नव्याने भर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

देशात कोरोना रुग्णवाढीचा मागील ८ दिवसात कमालीचा वाढला आहे. देशातील आकडेवारीचा विचार करता तिसरी लाट आल्याच्या सदृश्य परिस्थिती आहे. देशात काल (ता. १५) २ लाख ७१ हजार २०२ बाधितांची भर पडली आहे, तर ३१४ जणांचा कोरोनाने बळी गेला.१ लाख ३८ हजार ३३१ जणांनी कोरोनावर विजय मिळवला. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी (ता.१५) २ हजार ३६९ अधिक कोरोना केसेस वाढल्या आहेत.

देशात १५ लाख ५० हजार ३७७ ॲक्टिव्ह केसेस आहेत. देशात ८ जानेवारीपासून १२ लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त झाले आहेत. त्यामुळे देशाच्या दैनंदिन कोरोना संसर्ग दरात दोन टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सद्यस्थितीत कोरोना संसर्ग दर १६.२८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

शनिवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९४.८३ टक्क्यांपर्यंत घसरला.देशाचा दैनंदिन कोरोनासंसर्गदर १६.६६ टक्के, तर आठवड्याचा कोरोना संसर्गदर १२.८४ टक्के नोंदवण्यात आला आहे.

देशात आतापर्यंत ७ हजार ७४३ ओमायक्रॉनबाधित आढळले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात आतापर्यंत ७० कोटी २४ लाख ४८ हजार ८३८ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील १६ लाख ६५ हजार ४०४ तपासण्या शनिवारी करण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी देशभरात केंद्र तसेच राज्य सरकारच्या सहकार्याने ४ हजार ऑक्सीजन प्लॉंट सुरू असल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

दैनंदिन कोरोनाबाधितांचा वाढता आलेख

दिनांक दैनंदिन कोरोनाबाधित

१) ८ जानेवारी १ लाख ४१ हजार ९८६
२) ९ जानेवारी १ लाख ५९ हजार ६३२
३) १० जानेवारी १ लाख ७९ हजार ७२३
४) ११ जानेवारी १ लाख ६८ हजार ६३
५) १२ जानेवारी १ लाख ९३ हजार ७
६) १३ जानेवारी २ लाख ४७ हजार ४१७
७) १४ जानेवारी २ लाख ६४ हजार २०२
८) १५ जानेवारी २ लाख ७१ हजार २०२

हे ही वाचलं का?

Back to top button