ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्डमध्ये नवीन नाव कसे जोडावे ? स्टेप बाय स्टेप समजून घ्या

ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्डमध्ये नवीन नाव कसे जोडावे ? स्टेप बाय स्टेप समजून घ्या
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : रेशन कार्डच्या ( Ration Card ) सहाय्यनाने देशभरातील अनेक गरीब कुटुंबांना मोफत व रास्त भावात अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. हे रेशन कार्ड राज्य शासनाच्या वतीने बनवले जाते. आपले रेशन कार्ड हे आपल्या आधार कार्ड सोबत जोडलेले असते. ज्यामध्ये आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या अंगठ्याच्या स्कॅनद्वारे त्या कुटुंबाला महिन्याचे अन्नधान्य दिले जाते. सरकाने आता देशभरात रेशन कार्डद्वारे देशभरात कोठेही अन्नधान्य देण्याची व्यवस्था सुरु केली आहे. रेशन कार्ड लोकांना इतर अनेक प्रकारच्या सुविधा मिळण्यासाठी उपयोगी ठरते.

रेशन कार्ड ( Ration Card ) प्रत्येकांसाठी खूप महत्त्वासाठी आहे. अनेक वेळा रेशन कार्ड अपडेट करणे अथवा कुटुंबाच्या रेशन कार्डमध्ये नव्या व्यक्तींचे नाव समाविष्ट करणे अनेकांसाठी जिकिरीचे बनते. अनेकवेळा लोक काही एजंटांकडे हे काम देऊन स्वत:ची फसवणूक देखिल करुन घेतात. पण रेशन कार्डमध्ये अपडेट करणे व नव्या व्यक्तींचे नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.

नवे रेशन कार्ड बनविण्याची प्रक्रिया ऑनलाईन देखील उपलब्ध आहे

  • सर्वात प्रथम आपल्या राज्यातील अन्न व पुरवठा विभागाच्या अधिकारातील वेबसाईटला भेट द्या
  • याठिकाणी अपटेड करण्यासाठी आपले लॉग इन आयडी बनवावी लागेल
  • त्यानंतर आपल्याला रेशन कार्डमध्ये नवा सदस्याचे नाव समाविशष्ट करण्याचा विकल्प मिळेल.
  • त्या ठिकाणी क्लिक केल्यावर एक फॉर्म आपल्या समोर ओपन होईल.
  • त्या फॉर्ममध्ये आपल्या कुटुंबातील सर्व माहिती अपडेट करावी.
  • या फॉर्म सोबत नव्या आवश्यक कागदपत्राची सॉफ्ट कॉपी सुद्धा अपलोड करणे आवश्यक आहे.
  • हा फॉर्म सबमीट केल्यावर आपणास एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल.
  • या फॉर्मला पोर्टल सोबत ट्रॅक देखिल करु शकता. यानंतर फॉर्म व कागदपत्रांची विभागाच्या मार्फत पडताळणी केली जाते.
  • या फॉर्मचा स्वीकार केल्यानंतर आपणास पोस्टाद्वारे रेशन कार्ड तुमच्या घरी पाठवले जाते

रेशन कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे ( Ration Card )

  • आधार कार्ड
  • कुटुंबातील सदस्यांची पासपोर्ट साईज डिजीटल फोटो
  • पॅन कार्ड
  • मोबाईल नंबर
  • लाईट बील
  • बँक पासबुकचे झेरॉक्स
  • आपल्या गॅस कनेक्शची माहिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news