हाथरस प्रकरण; राहुल गांधींनी पीडितांच्या कुटुंबियांची घेतली भेट

मला या दुर्घटनेचे राजकारण करायचे नाही
Hathras Stampede Update
हाथरस प्रकरणातील पीडितांच्या कुटुंबियांची राहुल गांधींनी घेतली भेट.File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क :  उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोले बाबांच्या सत्संगात मंगळवारी (दि. 2) चेंगराचेंगरी झाली. यामध्ये आतापर्यंत 121 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेतील पिडित कुटूंबियांची भेट घेतली. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले, "दुर्घटनेतील कुटूंबियांना अधिक भरपाई  मिळावी" Hathras Stampede Update

काय म्हणाले राहुल गांधी?

Summary
  • हाथरस दुर्घटनेचे मला राजकारण करायचे नाही.

  • दुर्घटनेतील पिडीतांना भरपाई मिळावी.

  • व्यवस्थेमध्ये उणीवा आहेत.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोले बाबांच्या सत्संगात मंगळवारी (दि. 2) चेंगराचेंगरी झाली. यामध्ये आतापर्यंत 121 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेत 200 हून अधिक जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

Hathras Stampede Update
हाथरस प्रकरणातील पीडितांच्या कुटुंबियांची राहुल गांधींनी घेतली भेट.File Photo

कॉंग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी हातरस येथे झालेल्या चेंगराचेंगरी घटनेतील पीडितांची भेट घेतली आहे. आतापर्यंत १२१ लोकांचा मृत्यू झाला आहे. 

हाथरस प्रकरणातील पिडितांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत असताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, हाथरस चेंगराचेंगरी दुर्घटनेतील बऱ्याच कुटूंबातील लोक मरण पावले आहेत. मला या दुर्घटनेचे राजकारण नाही करायचे आहे. व्यवस्थेमध्ये उणीवा आहेत. मला वाटते त्यांना अधिक भरपाई  मिळावी. कारण ही कुटूंबे गरीब आहेत. कुटूंबियांनी सांगितले या ठिकाणी पोलिस बंदोबस्त नाही आहे. Hathras Stampede Update

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news