National Party AAP : पंजाब, दिल्ली आणि गोव्यानंतर गुजरातमध्येही आपने कमावली ६ टक्के मते; राष्ट्रीय पक्ष होण्याचा मार्ग मोकळा

National Party AAP : पंजाब, दिल्ली आणि गोव्यानंतर गुजरातमध्येही आपने कमावली ६ टक्के मते; राष्ट्रीय पक्ष होण्याचा मार्ग मोकळा
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजकीय पटलावर झपाट्याने विस्तारु पाहत असलेल्या आम आदमी पक्षाचा राष्ट्रीय पक्ष बनण्याचा मार्ग गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोकळा झाला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्ष बनण्यासाठी गुजरात किंवा हिमाचल प्रदेशात एकूण मतांपैकी किमान सहा टक्के मते मिळणे आणि दोन जागा जिंकणे आवश्यक होते. सध्या दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेत आहे. तर गोवा राज्यात गत निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाला ६.७७ टक्के मते प्राप्त झाली होती. याशिवाय दोन आमदारही निवडून आले होते. गुजरातमध्ये केलेल्या सरस कामगिरीनंतर आम आदमी पक्षाचा राष्ट्रीय पक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे गुजरातमध्ये पक्षाने वरील कामगिरी साध्य केली आहे. (National Party AAP)

गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला दहा टक्क्यांपेक्षा जास्त मते पडली आहेत.  त्यांचे दोनपेक्षा जास्त आमदार निवडून आले आहेत. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत 'आप' चमत्कार घडविला होता. पंधरा वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला 'आप' ने सत्तेतून पदच्युत केले होते. त्यापाठोपाठ आता गुजरातमध्येही पक्षाने सरस कामगिरी केली आहे. पुढील होणाऱ्या ९ राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच त्यानंतर २०२४ साली होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने 'आप' ला राष्ट्रीय पक्ष होण्याचा निश्चितपणे फायदा मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. (National Party AAP)

असा बनतो राष्ट्रीय पक्ष

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त करण्यासाठीच्या पात्रतेवर नजर टाकली तर कोणत्याही पक्षाला चार राज्यांत त्यांची ओळख बनविणे गरजेचे असते. ओळख बनविण्याची पात्रता म्हणजे किमान दोन आमदार असणे आणि विधानसभा निवडणुकीत किमान सहा टक्के मते प्राप्त होणे. (National Party AAP)

  • चार राज्‍यात प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळालेला हवा.
  • तीन राज्यांतून मिळून लोकसभेच्या तीन टक्के जागा जिंकायला हव्यात.
  • लोकसभेच्या चार जागांव्यतिरिक्त, संसदीय किंवा विधानसभा निवडणुकीत चार राज्यांमध्ये 6% मते मिळविलेली हवीत.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news