Nashik Onion Price : कांदा ११०० रुपयांनी घसरला, सरासरी दर ४२५२ वरून २२६० वर

Nashik Onion Price : कांदा ११०० रुपयांनी घसरला, सरासरी दर ४२५२ वरून २२६० वर
Published on
Updated on

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा- लासलगावसह जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये सोमवारी (दि. 11) कांदा लिलाव पूर्ववत सुरू झाल्याने बाजारपेठेत रौनक पाहायला मिळाली. मात्र, गुरुवारी (दि. ७) झालेल्या लिलावात कांद्यास मिळालेल्या दराची सोमवारच्या दराशी तुलना करता, क्विंटलमागे सुमारे ११०० रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले. (Nashik Onion Price)

कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील एक-दोन बाजार समित्या वळगता, सर्वच ठिकाणी कांदा लिलाव ठप्प झाले होते. जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीसह जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये पुन्हा लिलावांना सुरुवात झाली. पण लिलाव जरी सुरू झाले असले, तरी कांद्याचे भाव मात्र घसरले. केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी निर्णयाविरोधात गेल्या तीन दिवसांपासून कांद्याचे बंद असलेले लिलाव सुरू झाले. पण कांद्याचे भाव घसरल्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी वर्गात चिंता आहे.  (Nashik Onion Price)

सुमारे ५० ते ७० टक्के कांद्याला अवकाळी व गारपिटीचा तडाखा बसला आहे. त्यामुळे कांद्याला चांगला भावही मिळू लागला होता. लाल कांद्याला चार ते साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल असा समाधानकारक भाव मिळत असल्याने उरलेल्या कांदा विक्रीतून उत्पादन खर्च तरी निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र केंद्राच्या एका निर्णयाने कांदा दर कोसळल्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक कोंडीत सापडला आहे. (Nashik Onion Price)

नुकसान टाळण्यासाठी लिलाव

गुरुवारी (दि. 7) उन्हाळ कांद्यास किमान २५००, कमाल ४१४१, सरासरी ३६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाले होते. तर लाल कांद्याला किमान १६००, कमाल ४२५२, तर सरासरी ३३६० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाले होते. केंद्राने निर्यातबंदीचा तडकाफडकी निर्णय घेतल्यामुळे गेले दोन दिवस कांदा लिलाव ठप्प झाले होते. मात्र नवीन लाल कांद्याला टिकवण क्षमता कमी असल्याने शेतकरी वर्गाचे नुकसान टाळण्यासाठी व्यापारी वर्गाने बैठक घेत सोमवारी कांदा लिलाव पूर्ववत केले. मात्र या निर्णयाचा फटका बाजारभावावर दिसून आला. लाल कांद्याला सरासरी २२६०, तर उन्हाळ कांद्याला सरासरी २४५२ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news