

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेतर्फे आयोजित पुष्पोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री अर्चना निपाणकर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२४) करण्यात आले. रविवार (दि.२६)पर्यंत या पुष्पोत्सवाचा आनंद नाशिककरांना घेता येणार आहे.
उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी डी. गंगाथरन, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उद्यान विभागाचे उपआयुक्त विजयकुमार मुंडे, प्रशासन उपआयुक्त मनोज घोडे पाटील, अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपआयुक्त करुणा डहाळे, आरोग्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे, अधीक्षक अभियंता एस. एम. चव्हाणके, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेश महाजन आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस लता धुमाळ यांनी स्वागत गीत सादर केले. तर अणू धुमाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साथसंगत केली.
दि. २५ रोजी पं. प्रसाद दुसाने यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम हाेणार असून, दि. २६ मार्च रोजी मराठी अभिनेते भारत गणेशपुरे यांच्या उपस्थितीत पुष्पोत्सवाचा समारोप होणार आहे.