

नाशिक : नांदुरनाका परिसरात अंधारात लपून बसलेल्या संशयिताविरोधात आडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुनील एन. पगारे (२५, रा. पंचवटी) असे या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित सुनील हा रात्रीच्या सुमारास नांदुर नाका परिसराजवळील मोबाइल शॉपीच्या मागील बाजूस लपलेला आढळून आला.