बेन्नू लघुग्रहावरून आणलेल्या नमुन्यांमध्ये जीवसृष्टीची बीजे

बेन्नू लघुग्रहावरून आणलेल्या नमुन्यांमध्ये जीवसृष्टीची बीजे
Published on
Updated on

बेन्नू या लघुग्रहावरून 'ओसिरिस-रेक्स' या यानाने गोळा केलेल्या नमुन्यांचे छायाचित्र प्रथमच 'नासा'ने प्रसिद्ध केले आहे. बेन्नू या लघुग्रहाच्या पृष्ठभागावर उतरून 'नासा'च्या यानाने तेथील खडक व मातीचे हे नमुने गोळा केले होते. या 100 ते 250 ग्रॅम नमुन्यांमध्ये पाणी व कार्बनचा अंश असल्याचे 'नासा'ने म्हटले आहे. त्यामुळे या नमुन्यांमध्ये जीवसृष्टीची बीजे दडलेली असू शकतात, असेही 'नासा'चे म्हणणे आहे.

हौस्टनमधील 'नासा'च्या जॉन्सन स्पेस सेंटरमधील पत्रकार परिषदेत 'नासा'च्या संशोधकांनी ही माहिती दिली आहे. बेन्नू लघुग्रहाला भेट देऊन हे यान ताशी 43 हजार किलोमीटर इतक्या वेगाने प्रवास करून परत आले होते. त्यानंतर दोन आठवड्यांनी 'नासा'च्या संशोधकांनी हे नमुने दाखवले आहेत. या यानाने लघुग्रहापर्यंत आणि तेथून पृथ्वीपर्यंत एकूण 6.4 दशलक्ष किलोमीटरचा प्रवास केला आहे.

24 सप्टेंबरला हे यान पृथ्वीवर परतले होते व उटाहच्या वाळवंटात त्याचे सुरक्षित लँडिंगही झाले होते. त्यानंतर कॅप्सुलला जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये नेण्यात आले व त्यामधून आलेल्या या बेन्नू लघुग्रहाच्या नमुन्यांचे विश्लेषण सुरू करण्यात आले. बेन्नू हा आकाराने तुलनेने मोठा लघुग्रह आहे. त्याची पृथ्वीला धडक होण्याचा धोका 2700 मध्ये एक इतका नगण्य आहे. त्याच्यापासून किती धोका आहे यापेक्षा त्याच्यामध्ये काय दडले आहे इकडेच संशोधकांचे अधिक लक्ष होते.

'नासा'चे संशोधक बिल नेल्सन यांनी म्हटले आहे की कार्बन संपन्न अशा लघुग्रहाचे हे सर्वात मोठे नमुने आहेत. कार्बन आणि पाण्याचे रेणू यांचाच आम्ही शोध घेत होतो. आपल्या ग्रहाच्या निर्मितीमधीलही हे महत्त्वाचे घटक आहेत आणि त्यामुळेच या ग्रहावर जीवसृष्टीचा विकास होऊ शकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news