भंडारा : जुन्या वैमनस्यातून एकाची निर्घृण हत्या; एकास अटक

भंडारा : जुन्या वैमनस्यातून एकाची निर्घृण हत्या; एकास अटक

Published on

भंडारा : पुढारी वृत्तसेवा

जुन्या वैमनस्यातून दोन गटात झालेल्या वादात, एकाची चाकूने वार करत निर्घृण हत्या केल्याची घटना भंडारा शहरातील डॉ. आंबेडकर वार्ड मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मैदू पाटील असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी उमेश सोनकुसरे (वय 20) या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याच्या फरार साथीदारांचा पोलिस शोध घेत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, काल रात्री डॉ. आंबेकडर वॉर्डात नगर परिषदेच्या हॉलमध्ये असणाऱ्या एका लग्न समारंभासाठी पाटील व सोनकुसरे हे त्यांच्या आले होते. यावेळी एकमेकांकडे बघण्यावरून दोन्ही गटात वाद निर्माण झाला. त्यावेळी झालेल्या हाणामारीत आरोपी सोनकुसरे याने मृत मैदू पाटीलच्या छातीवर धारदार हत्याराने वार केले. यामध्ये त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
या घटनेनंतर सर्व आरोपी तेथून फरार झाले होते. याबाबत पोलिसांनी आरोपींचा शोध घेत असता मिळालेल्या माहितीनुसार उमेश सोनकुसरेला अटक केली. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news