Chhota Rajan Acquitted : दत्ता सामंत हत्या प्रकरणात गँगस्टर छोटा राजनची निर्दोष मुक्तता

Chhota Rajan Acquitted : दत्ता सामंत हत्या प्रकरणात गँगस्टर छोटा राजनची निर्दोष मुक्तता
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Datta Samant Murder Case : कामगार नेते डॉ. दत्ता सामंत हत्या प्रकरणातून गँगस्टर राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजनची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. डॉ. सामंत यांच्या हत्येचा सूत्रधार असल्याचा छोटा राजनवर आरोप होता. विशेष सीबीआय न्यायाधीश एएम पाटील यांनी ठोस पुराव्याअभावी राजनला या हायप्रोफाईल हत्याप्रकरणाच्या सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केले. फिर्यादीनुसार, 16 जानेवारी 1997 रोजी डॉ. सामंत हे पवईहून घाटकोपरच्या पंतनगरकडे जीपने जात असताना पद्मावती रोडवरील नरेश जनरल स्टोअरजवळ त्यांच्यावर हल्ला झाला. त्यात सामंत यांचा मृत्यू झाला होता.

विशेष सीबीआय न्यायाधीश एएम पाटील यांनी ठोस पुराव्याअभावी राजनला हत्येसंदर्भातील सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केले. फिर्यादीनुसार, 16 जानेवारी 1997 रोजी डॉ. सामंत हे पवईहून घाटकोपरच्या पंतनगरकडे जीपने जात असताना पद्मावती रोडवरील नरेश जनरल स्टोअरजवळ त्यांच्यावर हल्ला झाला. त्यात सामंत यांचा मृत्यू झाला होता.

फिर्यादीत म्हटले होते की, दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी डॉ. सामंत यांचे वाहन अडवले आणि त्यांच्यावर किमान सतरा राउंड फायर करण्यात आले. हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. डॉ. सामंत यांना तातडीने जवळच्या अनिकेत नर्सिंग होममध्ये नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर साकीनाका पोलिसांनी डॉ. सामंत यांचा चालक भीमराव सोनकांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news