

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईत परळमध्ये पेट्रोलपंपाच्या बाजूल आग लागल्याची घटना समोर आली आहे. महानगर पाईपलाईनमधील गॅस गळतीमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या आहेत.
परळ येथील पेट्रोलपंपाच्या जवळ महानगर गॅसची पाईपलाईन आहे. या पाईपलाईनमधून गॅस गळती झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान, आता घटनास्थळी महानगर गॅसचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा दाखल झाले आहेत.
हेही वाचा :