

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारताचा विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अनेक विक्रम केले आहेत. त्याने इंडियन प्रीमियर लीग सोडून सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कायमस्वरूपी स्मरणात राहणारी एक खेळी असेल तर ती म्हणजे 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकातील खेळी.
2011 च्या विश्वचषक फायनलमध्ये यष्टिरक्षक-फलंदाज एम.एस. धोनीची बॅट चांगलीच तळपली होती. धोनीच्या एका कट्टर चाहत्याने बॅट जिंकण्यासाठी 100,000 (सुमारे 1 कोटी भारतीय रुपये) ची बोली लावली. ही खरेदीदार आरके ग्लोबल शेअर्स अँड सिक्युरिटीज लिमिटेड नावाची कंपनी होती.
धोनीने अंतिम सामन्यात 79 चेंडूंचा सामना करत 91 धावांची नाबाद खेळी केली. नुवान कुलसेकराला षटकार ठोकून 28 वर्षांनंतर विश्वचषक जिंकला तो त्याच्या खेळीचा सर्वात महत्त्वाचा क्षण. विशेष म्हणजे तो शॉट त्याने ज्या बॅटने खेळला होता, जो भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जास्त पाहिलेला शॉट आहे आणि सर्वात महागडी बॅट असल्याचा विक्रम या बॅटच्या नावे आहे. लंडनमध्ये एम.एस. धोनीच्या 'ईस्ट मीटस् वेस्ट' चॅरिटी डिनरमध्ये बॅटचा लिलाव करण्यात आला.